Shreya Maskar
प्राणी संग्रहालयात आपण प्राण्यांना पिंजऱ्यात पाहतो आणि पर्यटक फिरतात. मात्र चीनमध्ये हे दृश्य वेगळ पाहायला मिळते.
चीनमधील 'लेहे लेदु वाइल्डलाइफ जू' प्राणी संग्रहालय अनोखे आहे.
या प्राणी संग्रहालयात पर्यटक पिंजऱ्यात कैद होतात तर प्राणी बाहेर मुक्तपणे फिरतात.
चीनमध्ये चोंगकिंग शहरात हे प्राणी संग्रहालय आहे.
या संग्रहालयात वाघ आणि अस्वलासोबत इतर अनेक प्राणी देखील पाहायला मिळतात.
येथे पिंजऱ्यासारख्या दिसणाऱ्या ट्रकमध्ये बसून पर्यटकांना फिरवले जाते.
या प्राणी संग्रहालयात पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.
संग्रहालयात 24 तास प्राण्यांवर लक्ष ठेवले जाते.