

अक्षय गवळी, अकोला, साम टीव्ही
अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. तब्बल २६८ शिक्षकांनी बदलीसाठी दिव्यांग आणि परित्यक्ता असल्याची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित शिक्षकांसह सुमारे ३०० जणांवर कारवाईची शक्यता असून शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. (akola zp teacher transfer scam fake certificates 300 face action)
अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी थेट दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र सादर केले आहेत. अनेक शिक्षकांनी स्वतःचा घटस्फोट झाल्याचा बनाव केला. या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित केले आहे. या २६८ शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या ३०० जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
तक्रारदार गणेश कुरई यांनी सांगितले की, शिक्षकांनी बदली मिळवण्यासाठी दिव्यांगचे बोगस प्रमाणपत्र जोडले आहे. काहींनी परितक्त्या आणि एकल महिलांना मिळणाऱ्या लाभासाठी थेट पतीसोबत घटस्फोट झाल्याचा बनाव केला आहे. काहींनी तर राहत असलेले ठिकाण बदलले आहे. या शिक्षकांना शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींनी साथ दिली आहे. या घोटाळ्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे.
बोगस प्रमाणपत्रे सादर करणारे २६८ शिक्षक
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी.
पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी
दिव्यांग प्रमाणपत्र देणारे आरोग्य विभागाचे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे कर्मचारी आणि अधिकारी
तक्रारीनंतर झालेल्या त्रिस्तरीय चौकशीचा अहवाल आला. तो अपूर्ण आणि त्यात त्रुटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अपात्र शिक्षकांना बदलीचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांसह चार शिक्षकांना सस्पेंड केलं आहे. आणखी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.