अकोल्यात भयंकर घडलं; आगीत होरपळून मामा-भाचीचा मृत्यू, हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

akola fire : अकोल्यात आगीत होरपळून मामा-भाचीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे .
akola news update
akola news Saam tv
Published On
Summary

अकोल्याच्या अडगाव बुज्रुग गावात घडली दुर्दैवी घटना

आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातून एक दुःखद घटना समोर आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अडगाव बुज्रुग गावात आज रात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागलेली असताना अचानकपणे मोठा पाठोपाठ स्फोट झाले आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय. चव्हाण नामक व्यक्तीच्या घरा ही आग लागली होती. घरात ज्वलनशील पदार्थ अर्थातच पेट्रोल आणि डिझेलचा साठा साठवून ठेवला होता. त्यामुळेच पाठोपाठ स्फोट झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविला जात होता.

आग लागल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांना मिळताच मोठी गर्दी या ठिकाणी जमली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांकडून अथक प्रयत्न सुरु होते. घरात काही सदस्य अडकून असल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी घरातील सदस्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. थोड्या वेळातच तिघांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी घरातील गंभीर स्वरूपात आगीत होरपळले गेले. या जखमींना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आलंय. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येती आहे. ही आग इतकी भीषण होती की शेजारील घर देखील आगीच्या आटोक्यात आले..

akola news update
माझा हत्येचा कट रचला जातोय; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

आगीत मामा-भाचीचा मृत्यू

या आगीच्या घटनेत एका पंचवीस वर्षे आणि दहा वर्षे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुरेश चव्हाण आणि स्वरा सोळंके असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर सुरेश यांची आई रत्नाबाई चव्हाण या देखील गंभीर आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, आगीची माहिती मिळतात आकोट अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली होती. नेमकी आग कशामुळे लागली आहेय याचं मुळ कारण अद्याप समोर आलेले नाहीये. चव्हाण यांच्या घरात ज्वलनशील पदार्थ अर्थातच पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळेच आग सुरु असताना पाठोपाठ स्फोट झाल्याचे सांगण्यात आहे, तर काहींनी सिलिंडरचा स्फोट झाला असल्याचं सांगितला आहे.

akola news update
6,6,6,6... ईशान किशनने नामीबियाला धुतलं; वादळी खेळीने मोडले अनेक विक्रम

या आगीत मामा-भाचीचा मृत्यू झाला आहे तर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अनुमान लावला जात आहे. घटनास्थळी हिवरखेड पोलीस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केलाय, पंचनामानंतरच आगी मागचं मूळ कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com