Washim News : पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ

Washim crime News : पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना वाशिममधून समोर आली आहे. या घटनेने वाशिममधील लोकांमध्ये खळबळ माजली आहे.
पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ
Washim NewsSaam tv

मनोज जैस्वाल, साम टीव्ही प्रतिनिधी

वाशिम : वाशिमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. तर या महिलेच्या पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. पती-पत्नीच्या मृत्यूने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील उषा विलास सुर्वे या महिलेची निर्घृण हत्या झाली आहे. तर तिचा पती विलास सुर्वे यांचाही मृतदेह झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे लोणी बुद्रुक परिसरात खळबळ माजली आहे.

पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ
Tamilnadu Crime : मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

लोणी बुद्रुक गावात राहणाऱ्या उषा सुर्वे या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सांयकाळी मोरदडा शिवारात आढळला. तर याच महिलेच्या पतीचा मृतदेह हा झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला. विलास सुर्वे असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. लोणीपासून जवळच असलेल्या लोणार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मढी शिवारात विलास सुर्वे यांचा मृतदेह आढळला.

उषा सुर्वे या महिलेच्या हत्येचा आणि विलास सुर्वे यांच्या मृत्यूचा तपास रिसोड पोलीस करत आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान रिसोड पोलिसांसमोर आहे. सुर्वे कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ
Thane Crime News: 'मी एकनाथ शिंदेंचा खास माणूस', मुख्यमंत्र्यांच्या नावाने खंडणीसाठी धमकी; ठाण्यात खळबळ

भयंकर! डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं

भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे. सांगलीतील विटा येथील खानापूर नाका परिसरात घडली.

गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी असे संशयित पतीचे असून सलमा गुराप्पा इकुरोट्टी मृत महिलेचे नाव आहे. गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास होता. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com