Marathwada Water: 'जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडा...' राज्य सरकारचा आदेश; सूत्रांची माहिती

Marathwada Water Crisis Update: सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मराठवाड्यात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळ झाला आहे. राज्य सरकारनेही तसे आदेश दिले आहेत.
sambhajinagar news Good news For Marathwada Farmers jayakwadi dam water level increased
sambhajinagar news Good news For Marathwada Farmers jayakwadi dam water level increasedSaam TV
Published On

Marathwada Water Crisis:

सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत जायकवाडी धरणात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतून पाणी सोडण्याच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मराठवाड्यात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळ झाला असून जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर हा वाद आता मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

याबाबतची आता महत्वाची अपडेट समोर आली असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याच्या शासनस्तरावरून सूचना आल्याचे सांगण्यात येत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sambhajinagar news Good news For Marathwada Farmers jayakwadi dam water level increased
Kartiki Ekadashi 2023: पंढरपुरात भाविकांची मांदियाळी; १ लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन

मात्र मराठा आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा अडसर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यास कोणताही गतिरोध नाही. सुप्रीम कोर्टाच्या आंदोलनाचे तंतोतंत पालन करणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पत्रातील सत्यता तपासणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे. (Latest Marathi News)

sambhajinagar news Good news For Marathwada Farmers jayakwadi dam water level increased
Maharashtra Tiger: चार राज्ये, २००० किलोमीटरचा प्रवास... ताडोबा जंगलातील वाघ थेट ओडीसात पोहोचला; कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com