Maharashtra Tiger: चार राज्ये, २००० किलोमीटरचा प्रवास... ताडोबा जंगलातील वाघ थेट ओडीसात पोहोचला; कारण काय?

Maharashtra tiger covers 2000 km: या वाघाने अनेक अडथळे पार करत महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि ओडीसा राज्याचा प्रवास केला.
Maharashtra tiger covers 2000 km:
Maharashtra tiger covers 2000 km:Saamtv
Published On

Maharashtra Bengal Tiger:

महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथील ताडोबाच्या लँडस्केपमधील एका नर वाघाने 4 राज्यांची जंगले पार करत सुमारे 2,000 किमी प्रवास केल्याचे समोर आले आहे. ओडिशाच्या जंगलात रॉयल बंगाल दिसल्याची माहिती एका वनअधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. सुरक्षित प्रदेश आणि जोडीदाराच्या शोधात हे स्थलांतर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओडिशाच्या (Odisha) जंगलात रॉयल बंगाल टायगर दिसला असून त्याने आतापर्यंत 2 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. एका वन कर्मचाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. वनविभागांना वाघ रेडिओ-कॉलर असताना अशा स्थलांतरित प्राण्यांची माहिती मिळते, परंतु विदर्भातील ब्रम्हपुरी जंगलात वाघ रेडिओ-कॉलर नव्हता मात्र त्याच्या पट्ट्यांच्या पॅटर्नवरून तो ओळखला गेला.

हे कदाचित देशातील दुसरे-सर्वात लांब वाघांचे स्थलांतर असू शकते. वाघाने पाणवठे, नद्या, शेतजमीन, रस्ते, मानवी वस्ती अनेक अडथळे पार करत महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि ओडीसा राज्याचा प्रवास केला. या २००० किलोमीटरच्या प्रवासात त्याने कोणत्याही प्राण्यावर, माणसांवर हल्ला केल्याची नोंद करण्यात आली नाही.

Maharashtra tiger covers 2000 km:
Maharashtra Political News : संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा डिवचलं; मकाऊतील आणखी एक व्हिडीओ केला शेअर

वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रॉयल बंगाल टायगरच्या या प्रदीर्घ प्रवासाचा उद्देश स्वत:साठी चांगले क्षेत्र शोधणे हा असावा. म्हणजे हा वाघ स्वतःसाठी योग्य आणि सुरक्षित क्षेत्राच्या शोधात निघाला होता.

मात्र, वाघाने एका गायीला ठार केल्याने नजीकच्या अनालाबारा गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच ओडीशाच्या वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जून-जुलैमध्ये वाघ ओडिशा आणि आंध्र प्रदेश दरम्यान फिरत राहिला. सप्टेंबरमध्ये, महेंद्रगिरी पर्वतरांगातील ओडिशात तो पुन्हा दिसला. (Latest Marathi News)

' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra tiger covers 2000 km:
Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्री महाराजांवर गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी; काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com