Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी साेडू नका, का धाडलं गेले पत्र (पाहा व्हिडिओ)

या पत्रात पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.
do not release water in jayakwadi dam letter issued on security purpose
do not release water in jayakwadi dam letter issued on security purpose Saam tv
Published On

Chhatrapati Sambhajinagar News :

जायकवाडीच्या पाण्यावरुन (jayakwadi dam latest marathi news) मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद पेटला असताना आता आणखी एका पत्रामुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हं निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत मराठा आरक्षणाचे (maratha reservation) आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सूचना दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra News)

विशेष म्हणजे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत. या पत्रात पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.

do not release water in jayakwadi dam letter issued on security purpose
Pandharpur : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत दोन वर्षाची चिमुकली पडली अन् भाविकांत गाेंधळ उडाला, अखेर...

पत्रात म्हटलं आहे

जायकवाडीवरुन न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरु आहे. यामध्ये काही दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयास कुठेही स्थगिती दिलेली नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने देखील या आदेशास स्थगिती दिलेली नाही. त्याची पुढील सुनावणी ५ डिसेंबरला हाेत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाणी सोडण्याच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने जायकवाडीच्या धरणाच्या निम्न भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांची पाणी सोडण्याबाबात आग्रही मागणी होत आहे.

गोदावरी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. यामुळे या कार्यालय परिसरात पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सुचना आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आलेली आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

do not release water in jayakwadi dam letter issued on security purpose
Electric Bike Fire News: वाईत खळबळ, प्रवासातच इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com