Maharashtra Live News Update: आजोबा आणि नातवांमध्ये काय चर्चा चालू असावी? बारामती मधील फोटो, व्हिडिओ व्हायरल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: आजोबा आणि नातवांमध्ये काय चर्चा चालू असावी? बारामती मधील फोटो, व्हिडिओ व्हायरल

अजित पवारांच्या निधनानंतर काल पवार कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून लोक बारामती मध्ये येत होते. त्यांच्या भावना स्वीकारण्यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित होते. बारामती मधील सहयोग सोसायटी मध्ये पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. मात्र यावेळी आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील एक संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकाना प्रश्न पडला असणार आहे की या दोघांत कुठली चर्चा झाली. तसेच काही फोटोंमध्ये आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत. त्या तिघांमध्ये सुद्धा काही चर्चा, बातचीत करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंची जोरदार चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं...

चिखला माईन परिसरात वाघाचा थरार

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला माईन परिसरात वाघाने पुन्हा एकदा आपले क्रूर रूप दाखवले असून,येथील दहशतीने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी दोन गायींची शिकार केल्यानंतर,रात्री वाघाने प्रभू बजरंग गोशाळेत शिरून एका गर्भवती गायीचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, वनविभागाच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट उसळली आहे.चिखला माईन येथील प्रभू बजरंग गोशाळेत रात्री नेहमीप्रमाणे सर्व जनावरे बांधलेली होती.दबा धरून बसलेल्या वाघाने गोशाळेत थेट घुसखोरी केली.गोशाळेतील एका गर्भवती गायीवर हल्ला चढवत तिला जागीच ठार केले. वाघाच्या डरकाळीने आणि जनावरांच्या ओरडण्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, याच गोशाळेत आठवडाभरापूर्वीच वाघाने दोन गायींचा फडशा पाडला होता. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे रक्ताची होळी खेळणाऱ्या या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.सततच्या हल्ल्यांमुळे चिखला माईनसह परिसरातील गावांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.

स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचे बिरुद मिरवणाऱ्या नागपूर मध्ये प्रत्यक्षात अस्वच्छता

स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचे बिरुद मिरवणाऱ्या नागपूर मध्ये प्रत्यक्षात अस्वच्छता

नागपूर मधील अस्वच्छतेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल, याचिका दाखल करण्याचे नागपूर खंडपीठाने दिले आदेश

शहरातील अस्वच्छतेवर न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

न्यायमूर्ती अनिल किलोर, राज वाकोडे यांच्या समक्ष यावर सुनावणी झाली असून जनहित याचिका हाताळण्यासाठी एडवोकेट यशोवर्धन सांबरे यांची नियुक्ती केली आहे

दोन आठवड्याचा अवधी यासाठी न्यायालयाने दिला असून शहराला कचरामुक्त करण्याचे महापालिकेकडून केले जाणारे दावे ठिकठिकाणी तयार झालेल्या कचऱ्याचे ढीग, रस्त्यांवरील अतिक्रमण या सर्व गोष्टींचा यात समावेश केला जाणार आहे

नागपूर मनपा शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक तर वर्षाला 100 कोटी रुपयांच्या घरात खर्च करत असताना शहर स्वच्छ का होत नाही असा सवाल न्यायालयाने व्यक्त केला

Baramati: बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान

बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान

जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२

जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार

सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात

एसटी बस चा ब्रेक फेल झाल्यान अपघात,२ जण जखमी

नाशिकच्या येवला शहरात रात्रीच्या सुमारास एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घ़ली आहे.पुणे येथून धुळे येथे जात असलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याने फत्तेबुरूज नाक्याजवळ अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकाना जवळ घुसल्याने यात दोन नागरीक जखमी झाले,अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक धावून आले त्यांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखले केले तर सुदैवाने बस मधिल कोणाला ही ईजा झाली नाही,दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले,जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर असून,प्राथमिक माहिती नुसार बसच्या ब्रेक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ - आदिवाशी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात निष्कृष्ट दर्जाचे जेवण

यवतमाळच्या पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहमध्ये जेवणाच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाल्याची चर्चा असताना लाखो रुपयांच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना निष्कृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.यासदर्भात भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी वसतिगृहाला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी आमदार तोडसाम यांना वसतिगृहमधील समस्याचा पाढा वाचून दाखविला. विद्यार्थ्यांनी सांगितले, की मिळणारे जेवण अतिशय निष्कृष्ट दर्जाचे आहे. अंडी, नॉनव्हेज,वरण-भात आणि केळी डाळ सुद्धा निष्कृट दर्जाची आहे.वसतिगृहमध्ये अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा आरोप देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केला.आमदारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत स्वतः जेवणाचा स्वाद घेतला जेवणाचा दर्जा घसरलेला असल्याचे आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. त्वरित अशा कंट्रकवर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्याकडून यावेळी करण्यात आली.

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला

ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून लढवत आहेत निवडणूक

उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली घटना

अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही बचावले थोडक्यात

उंडाळे गावातील घटनेनंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

अकोल्यात लग्नाच्या मिरणवूकीत फिरवल्या नंग्या तलवारी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात काल रात्री एका लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र, या लग्न मिरवणुकीत तरुणांना नंग्या तलवारीसह नाचनं चांगलंच अंगाशी आलंये. कारण, डीजेवर तालावर काही तरुण या ठिकाणी नंग्या तलवारी फिरवत होते, याचं वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला ही तलवार लागलीये.. यात मुलाच्या डोक्याला मोठा मार लागलाये. तर त्याच्या डोक्याला 5 टाके लागले आहे. मुलावर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतंये. या प्रकरणी बाळापूर शहर पोलिस पुढील तपास करतायेत..दरम्यान, एखाद्या कार्यक्रमात म्यानातून तलावर उपसली तरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होतंये.. मात्र, काल बाळापूरात या लग्न मिरवणुकीत अशाप्रकारे तलवारी फिरविल्याव जात असेल तर त्यावेळी पोलिसांकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष झालं होत कां? असा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com