

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर मोठी वाहतूक कोंडी
मलकापूर नांदुरा दरम्यान वाडीगावाजवळ ट्रकला अपघात झाल्याने मुंबईहून नागपूरकडे जाणारी मार्ग बंद
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
वाहनांच्या चार ते पाच किमीपर्यंत रांगा.
वाहतूक पोलीस अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न
वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहनधारकांना करावा लागतोय त्रासाचा सामना..
भास्कर जाधव काय म्हणाले?
रामदास कदम यांचा हफ्तेखोर असा केला उल्लेख
मी आमदार झालो मंत्री झालो पण पावसाळ्यात नांगर धरतो
रामदास कदम यांचे पैसे घेऊ नका
हफ्याचे पैसे आहेतच पण पत्नीच्या नावाने असलेल्या बार मध्ये बाया नाचवतो
मेघालयामध्ये अनधिकृत कोळसा खाणीत स्फोट झाला. या खाणीत स्फोट स्फोट होऊन १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे शिवसेनेचा एकही प्रमुख नेता दिसत नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. जनता हुशार असून तिच्या कोणत्याही मताला गृहीत धरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण पराभव पाहिलेला असल्याने कधीही ओव्हरकॉन्फिडन्समध्ये काम करत नसल्याचे राणे म्हणाले. आपल्या प्रचारावर आपण बोलू शकतो, मात्र समोरचा पक्ष कुठे कमी पडतोय हे त्यांनीच पाहावे, असा टोला त्यांनी लगावला. कदाचित देण्यासारखे काही नसल्यामुळे ते लोकांसमोर जाणे टाळत असावेत, असेही ते म्हणाले. ठाकरे शिवसेनेकडे आता कार्यकर्तेही उरले नसून ही निवडणूक त्यांना जबरदस्तीने लढवावी लागत असल्याचा दावा राणे यांनी केला.
पुणे महापालिकेतील महापौर निवडीनंतर भाजपाकडून कोणताही जल्लोष केला जाणार नाही. पक्षाच्या भूमिकेनुसार महापौर निवडीनंतर फक्त एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच पहिल्याच मुख्यसभेत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता संयम आणि संवेदनशीलता जपण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे समजते.
डोंबिवली MIDC येथील निवासी भागात वाहन शिकत असताना मोठा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने मारुती सेलेरिओ कार थेट गटारात घुसली. या गाडीत वाहन शिकणारी युवती आणि प्रशिक्षण देणारा चालक होते. सुदैवाने दोघेही थोडक्यात बचावले. अपघाताच्या वेळी परिसरात गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेत गटाराचे तसेच महावितरणच्या स्टे केबलचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत निवासी भागात वाहन प्रशिक्षण देण्यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. अशा ठिकाणी वाहन शिकवणे धोकादायक असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
एम्बायो कंपनीला भीषण आग
० औषधी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीला आग
० भीषण आगीमुळे कंपनी परिसरात भीतीचे वातावरण
० आगीमुळे परिसरात धुराचे लोट
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी आज भाजपच्या वतीने गटाची नोंदणी करण्यात आली. गटनेता म्हणून गोविंद केंद्रे म्हणून निवड करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सर्व नगरसेवक एकत्र येत ही नोंदणी keliy. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 57 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत. उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तत्पूर्वी ही गटाची नोंदणी करण्यात आली.
यावेळी खाडी किनारी मच्छीमारी करण्यासाठी असलेल्या काही नागरिकांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले आहे
आज दुपारी वाशी खाडी येथे ही घटना घडली होती
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या व्यक्तीचे प्राण हे वाचलेले आहे
कुंभमेळा मध्ये श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने केला ऐच्छिक निर्णय
रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिला होता आंदोलनाचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील कॉलेज व विद्यार्थ्यांना केला होता निर्णय लागू
कुंभमेळ्यात काम करण्यासाठी केला होता निर्णय लागू
विद्यार्थी संघटना आक्रमक होत त्यांनी दिला आज कुलगुरूंना निवेदन
पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी केला सभात्याग
राज्यसभेतील खासदारांनी केला सभात्याग
पीएम नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू
भारताचा वेगाने विकास होतोय
आपल्याला ना थांबायचंय, ना मागे वळून पाहायचंय
वयोमर्यादेनुसार खरगेंनी खाली बसून घोषणा द्याव्यात
पीएम मोदी यांचा मल्लिकार्जुन खरगे यांना टोला
मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांकडून घोषणाबाजी
राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ
पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजी
'हुकुमशाही चालणार नाही', विरोधकांच्या घोषणाबाजी
नवी मुंबईच्या नगरसेवकांनी घेतली गणेश नाईकांची भेट
नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर झाल्यानंतर सुजाता सुरज पाटील यांनी घेतली गणेश नाईक यांची भेट
भाजपच्या नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते
रायगड जिल्ह्यात शेकाप शिवसेनेत जुंपली
सत्ताधारी कामे मंजूर करून खोटी बिलं काढतात
शेकाप नेते जयंत पाटील यांचा आरोप
गेली 15 वर्षे शेकाप जिल्हा परिषद सत्तेत होता
खोटी बिले काढणारा शेकाप आणि भाजपातील पाटील कंपनीचं
जिल्हाप्रमुख राजा केणी यांचा पलटवार
जालना जिल्ह्यातील जवळपास 470 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याची जिल्ह्यातील सरपंच संघटनेची मागणी...
राजस्थानच्या धरतीवरती महाराष्ट्रात देखील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक म्हणून सरपंचांची नेमणूक करण्याची मागणी...
सरपंच संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सीईओना दिले निवेदन
पालघर जिल्ह्यातील इमारती बांधकामाबाबत चौकशी करण्यात यावी
वनमंत्री गणेश नाईक यांची मागणी
एसआयटी मार्फत चौकशी करावी
माझी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पालघर शहरातील सर्व इमारतींच्या बांधकामाची व्हावी
नवी मुंबईतील प्रश्नांबाबत मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये हरामाचा पैसा उपयोगी पडला नाही.
अकोल्यातून मोठी बातमी समोर येत आहे.. संपूर्ण राज्यातल्या भागधारकांचे लक्ष लागून असलेल्या महाबीज'च्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) दोन संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आलाय.. अकोला (विदर्भ) मतदारसंघातून डॉ. रणजित सपकाळ यांची अविरोध निवड झालीय.. तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांचीही अविरोध निवड झालीय.. ऐनवेळी इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली आहे. दरम्यान, महाबीजच्या दोन संचालकांच्या निवडीसाठी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु होती. या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात अविरोध निवड झालीय.. विदर्भ मतदार संघातून अकोला येथील भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांचे निकवर्तीय डॉ. रणजित सपकाळ तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड झालीय.. देशमुख हे बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील रहिवासी आहे..
महापौरपदाचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भाजप सदस्य महापालिकेत दाखल. भाजपकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालना पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी दाखल पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेत.मनोज जरांगे यांचे जुने सहकारी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन माजी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलीस अधीक्षक यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती निवडणुकीदरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी युतीमध्ये गोंधळ निर्माण झालाय.शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका,तर आघाडीचा धर्म पाळा,असं जाहीर सभेतून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोहोळ तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असली तरी नरखेड पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांना,तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रगती दगडे यांना उमेदवारी देण्यात आलीय.युती असताना देखील एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने आधीपासूनच संभ्रमाची स्थिती होती.
उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधिवर वर्ध्याचे एडवोकेट हर्षवर्धन गोडघाटे यांचे राज्यपालांना पत्र
शपथविधीच्या अनुषंगाने एडवोकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी लिहिले राज्यपालांना पत्र
शपथविधी घेताना जे पद आणी गोपनीयतेची शपथ दिली आहे, शपथ विधीची तरतूद संविधानात दिली आहे
संविधानाच्या अनुच्छेद 164 मध्ये असं सांगितलं आहे की संविधानाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीने शपथ घेणे अभिप्रेत आहे
परंतु सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताना उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला आहे, भारतीय संविधानात कुठेच उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाहीय, त्यामुळे त्यांनी घेतलेली शपथ ही
संविधानात उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नसल्याची गोडघाटे यांची माहिती
यामुळे सुनेत्रा पवार यांनी घेतलेला शपथविधी हा बावकायदेशीर आणी भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन घेतला अस्याचा आरोप
या संदर्भात राज्यपाल यांनी सुद्धा जो पत्र काढला होता त्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देत आहे असा उल्लेख केला होता जर राज्यपाल आणी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत खुलेआम भारतीय संविधानाची तरतुदीची उल्लंघन करत असेल तर हे भारतीय म्हणून वाईट प्रसंग आहे
या संदर्भात राज्यपाल यांना गोडघाटे यांनी मेल करत पत्र पाठवले आहे
शपथ घेताना संविधानाच्या शेड्युल 3 मधील पद्धतीने शपथ घेतली नसल्याचे गोडघाटे यांचे राज्यपालांना पत्र
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या चार दिवसानंतर राज्यपालांना पत्र
मंत्रालयातील उपहारगृहात आता अॅल्युमिनियम ऐवजी स्टीलची भांडी वापरणार
स्टील भांडी खरेदीसाठी ५ लाख रुपयांची तरतूद
इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडीसह मायक्रोवेव्ह ओव्हन देखील खरेदी करणार
स्टील डब्यासह राईस जाळी, परात अशी सर्व भांडी स्टीलची वापरली जाणार
शिवसेना उभाठा गटाने महापौर पदाचा नामांकन अर्ज दाखल केला. मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर पदासाठी, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रशांत दानव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज देखील संध्याकाळी संपूर्ण पवार कुटुंब येणार एकत्र...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी आज सांत्वनपर भेटी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान कार्यकर्ते नागरिक येणार आहेत..
या वेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित असणार आहेत..
काल सांत्वन भेट घेण्यासाठी आलेल्या सर्व लोकांना शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यासह सर्व पवार कुटुंबातील सदस्य भेटले..
मोबाईल टॉर्च घेऊन रात्रीच्या अंधारात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करावा लागल्याचा प्रकार घडला आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गार्डी व घानवाडमध्ये हा प्रकार झाला आहे.
अंधेरी पूर्वेतील पंप हाऊस येथे आघाडी नगर येथील सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या केबिनला अचानक आग लागली.
या आगीत केबिनशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना आग लागून दोन चारचाकी आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलीसही घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू
जालना शहरात गुन्हेगारांच्या हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पोलिसांनी शहरात दहा बीट मार्शल तयार केले आहेत.शहरातील चारही पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकीवरून दहा बीट मार्शलची 24 तास फिरतीगस्त ठेवली जाणार आहे दुचाकींना जीपीएस ट्रॅकर बसवण्यात आले असून एक बीट मार्शल किती भागात फिरला तो सध्या कुठे आहे याच नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातून केले जाणार आहे. आज विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते बीट मार्शल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आल आहे तर आजपासून बीट मार्शल ची शहरात गस्त सुरू झाली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उभा केला जाणार अजित पवारांचा भव्य पुतळा
पार्थ पवार जय पवार रोहित पवार यांच्याकडून नकाशाची पाहणी
म्हाडाच्या अंधेरी येथील पीएमजीपी कॉलनीत बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता एका घराचे छत कोसळले
या अपघातात छताचा भाग थेट डोक्यावर पडल्याने एक व्यक्ती जखमी झाली.
लोकसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब
सलग चौथ्या दिवशी लोकसभेचे कामकाज ठप्प
विधानसभा आणि विधानपरिषद आमदार जाणार लंडन दौऱ्यावर
या दौऱ्यात एकूण १५ आमदार सहभागी होणार असून भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उबाठाकडून सरदेसाई यांचा समावेश आहे.
लंडनमधील प्रशासकीय कामकाजाचा करणार अभ्यास
नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा करणार अभ्यास
विधिमंडळाचा अभ्यास दौरा आयोजित
१५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा दौरा पार पडणार
या भेटीत शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार
भाजपच्या नगरसेविका रूपाली भगत यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने दिला
न्यायालयाने सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर. निवडणुकीमध्ये रूपाली भगत यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे
भाजपनेच रात्री शिवसेनेचा गेम केला
शिवसेना विरुद्ध भाजपा नवी मुंबई पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू
भाजपाच्या नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी नायालयात याचिका दाखल केली होती .त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पदावर न्यायालयाने त स्थगिती घातली आहे. .
मात्र न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांना मतदान करण्याचा अधिकार आज बजावण्याचा आदेश देण्यात आले आहे त्यामुळे न्यायालयाने स्थगिती उठवली आहे
ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर या गावच्या ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे.
पवार कुटुंबीय पुन्हा येणार एकत्र...
थोड्याच वेळात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबीयांची बैठक.
बैठकीला शरद पवार पार्थ पवार जय पवार युगेंद्र पवार राहणार उपस्थित.
विविध विषयांवर बैठक होणार असल्याची माहिती:सूत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला हजेरी लावतात का!
याकडे सर्वांचे लक्ष!
32 तासांनंतर खंडाळा घाटात पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरू झाली असली, तरी लोणावळ्याच्या अलीकडे परिस्थिती अद्याप जैसे थे आहे.
लोणावळ्याजवळ अजूनही 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
20 ते 22 किलोमीटरची दीर्घ वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहनचालक आपल्या वाहनातच झोपले होते. रात्री उशिरा वाहतूक खुली झाल्याची माहिती त्यांना नव्हती. आता पोलीस वाहनचालकांना झोपेतून उठवून वाहने पुढे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एक्सप्रेस वे वर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी विभागाला फटका
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एसटीच्या 139 फेऱ्या रद्द
तर 163 बसेस अडकल्या वाहतूक कोंडीत
प्रवाशांचे हाल आणि एसटी प्रशासनाचे मोठे नुकसान
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 139 बसेस काल एका दिवसात रद्द
स्वारगेट आणि पुणे स्टेशन वरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसेस काल होत्या थांबून
शिवसेना विरुद्ध भाजपा महापौर उपमहापौर निवडणुकीत आमने-सामने
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना नवी मुंबईत रंगला होता आता शिवसेना विरुद्ध भाजपा नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उप महापौर या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सामना रंगणार आहे
त्यामुळे शिवसेनेने सुद्धा महापौर आणि उपमहापौर उमेदवारी अर्ज दाखल केले आहे
त्यामुळे महापौर आणि महापौर या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने आमने-सामने आले आहेत
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे
तसेच भाजपकडे बहुमत असल्यामुळे तरी शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची लातूरच्या कामखेडा येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने जाहीर सभा संपन्न झाली, या सभेत गुलाबराव पाटील यांनी लातूर ग्रामीणचे भाजपाचे आमदार रमेश कराड यांच्यावर सडकून टीका केली. रेनापुर ते कामखेडा जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पहा, गुडघ्या इतका ले खड्डे रस्त्याला आहेत. या आमदाराचे लक्ष नाही का, राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता या आमदाराची काही सरकारकडे पथ नाही का ? आमदाराचा ग्रामस्थांनी सत्कार करावा, पुढच्या वेळेला आमदारकीला भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल अशा तीव्र शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार रमेश कराड यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे.
जळगावजामोद शहरात सदगुरु बनानाच्या लगत असलेल्या शेतामधील गोठ्याला भीषण आग लागल्याने बैलजोडीसह, तूर, गहू, ज्वारी ,कुटार, स्प्रिंकलर 30 पाईप शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. ..
जळगाव जामोद शहराला लागूनच असलेल्या मूर्तीजापूर शेत शिवारातील गंगाराम शामराव ढगे यांच्या शेतातील गोठ्याला रात्री अचानक भीषण आग लागल्याने गोठा जळून झाला. यामध्ये बैल जोडी, कुटार, गहू ज्वारी, स्पिंकलर पाईप सह पाच लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले असून, शेतकरी गंगाराम ढगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून,
शासनाने पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सादर शेतकऱ्याने केली आहे,आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे समजू शकले नाही..
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूकीचा अंतिम टप्प्यात प्रचार पोहचला शिगेला, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटात भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कोंडी गटात भाजप उमेदवार डॉ.पृथ्वीराज माने उभे आहेत निवडणूकीच्या रिंगणात,माजी आमदार दिलीप माने यांचे डॉ.पृथ्वीराज माने आहेत चिरंजीव
डॉ.पृथ्वीराज माने यांच्या प्रचारात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलीय जाहीर सभा
तर कोंडी गावात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपाकडून काढण्यात आली पदयात्रा
माजी आमदाराचा मुलगा जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याने या लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील पहिल्याच सभेत सुनेत्रा पवारांचा विसर पडला अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीने काल बुधवारी प्रथमच रायगडमध्ये प्रचार सभा घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे या सभेला प्रमुख मार्गदर्शक होते. या सभेच्या बॅनरमध्ये सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्याने चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलिन होणार या मुद्दयावर राजकिय वर्तुळ आणि सोशल मिडियावर सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना व्हिलन बनवल जात असताना मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील पहिल्याच सभेत सुनेत्रा पवारां चा विसर पडला का असा सवाल चर्चेत येत आहे.
आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल
आज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पुणे शहरातील बहुतांश परिसरात वीजपुरवठा राहणार बंद
पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही परिसरात वीज पुरवठा उद्या राहणार बंद
वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा राहणार बंद
महावितरण विभागाकडून निवेदन प्रसिद्ध
नंदुरबार जिल्ह्यातील वावद परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर डंपर चालकाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांनी विनापरवाना वाळूने भरलेला डंपर अडवला असता, चालक आणि त्यांच्यात तीव्र वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. डंपर चालकाने कारवाईच्या रागातून घोडके यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
संगमेश्वरमधील कसबा जिल्हा परिषद गटात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळतेय शिवसेना उबाठाकडून विशाखा कुवळेकर तर शिवसेना शिंदे गटाकडून रचना महाडीक निवडणूकीच्या रिंगणात आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. उबाठाच्या विशाखा कुवळेकर यांचा सध्या घरोघरी प्रचारावर जास्त भर असलेला पहायला मिळतोय.मला या भूमीतून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे.. या भूमीचा चांगल्या प्रकारे मी विकास करेन, लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय, आमचे निष्ठावान शिवसैनिक तळागाळापर्यंत पोहचलेले आहेत, आमचं संघटन मजबूत असल्याने मोठ्या मताधिक्याने आपला विजय होईल असा विश्वास यावेळी कुवळेकर यांनी व्यक्त केला..
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रायगडच्या अलिबागमध्ये जाहिर सभा घेतली. शेकाप नेते जयंत पाटील यांनी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदेसेना आणि भाजपवर कडाडून टिका केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब निर्णय
कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप घेतला जाणार
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्यात येणार
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्यात येणार
प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात येणार
विद्यार्थ्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’अंतर्गत दोन श्रेयांक देण्याची तरतूद आहे.
दोन श्रेयांकांसाठी ६० तास काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रेयांक मिळण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक दिले जातील.
परभणीच्या टाकळी कुंभकर्ण गटातून २२ वर्षीय उच्चशिक्षित प्रतिक्षा जैस्वाल ही उबाठा शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे.प्रतिक्षा जैस्वाल हिचे शिक्षण बी कॉम एवढे झाले असून सध्या ती एम कॉम करत आहे.प्रतीक्षाचे वडिल प्रभाकर जैस्वाल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत ते यावेळी त्यांनी स्वतः उभे न राहता प्रतिक्षाला संधी दिली आहे.आणि प्रतिक्षा ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे सकाळी लवकर प्रचाराला लागून सामान्य मतदारांना आपला निवडणुकीचा अजेंडा ती सांगत आहे.मतदान कस करायचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्याला याचे प्रात्यक्षिक ही ती करून दाखवत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे हिंदू हिंदू बोलून मतं मागतात त्यांना लाजलज्जा राहिलेली नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हते त्यामुळे 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यांच हिंदुत्व सोयीनुसार असतं असंही जयंत पाटील म्हणाले.
गोरेगाव पश्चिमेत नाले सफाईदरम्यान विषारी वायूचा श्वास — एकाचा जागीच मृत्यू
दुसरा कामगार गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याने घरावर शोककळा
सुरक्षा उपकरणांशिवाय नाल्यात उतरवल्याचा गंभीर आरोप
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.