Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Daharshiv: रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आंदोलनाला बसणार,बाळराजे आवारे पाटलांचा निर्धार

आंदोलन बाळराजे आवारे पाटील यांच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू

ईव्हीएम हटाव यासाठी धाराशिव च्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपलं

पोलिसांच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करत आहे

माझी कसल्याही पद्धतीने प्रकृती खालावलेली नाही मी पोलिसांना डॉक्टरला बोलून चेक करा म्हणत होतो

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मशीनवर घेण्याऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्या ही आमची मागणी होती

आमचा लढा निवडणूक आयोग सोबत होता, ईव्हीएम हटवलोकतंत्र वाचवा या आमच्या मागणीवर ठाम

रात्री दोन वाजता शंभर पोलिसांचा पाऊस फाटा आला आणि आमचे सुरू असलेले आंदोलन त्यांनी मोडीत काढलं बाळराजे आवारे पाटील यांचा आरोप

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 24 आरोपींना अटक उर्वरित आरोपींचा शोध सुरू

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 74 कर्मचारी दोषी असताना प्रत्यक्षात 28 कर्मचाऱ्यांवरतीच प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर आक्रमक झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांसह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यामुळे हक्कभंग आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जालन्यातील अंबड आणि घनसांगी तालुक्यात 2022 मधील शेतकऱ्यांचे जवळपास 24 कोटी अतिवृष्टी अनुदान तलाठी आणि इतर कर्मचारी लाटण्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि चौकशी समिती नेमून 74 कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं मात्र यापैकी केवळ 28 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आतापर्यंत 24 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मर्ज होणार

मोहोळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांचं मोठं विधान.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादीची युती झाली.

'आतली गोष्ट सांगतो, बारामतीत अजित दादांसोबत आमची बैठक झाली. त्यावेळी जिल्ह्यातील चार आमदार आणि एक खासदारासह दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बैठकीला उपस्थित होतो'

तीन महिन्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याची घोषणा करता आली नाही

यवतमाळात कापूस- सोयाबीनचे भाव घसरले तुरीला अच्छे दिन

कापूस सोयाबीन या प्रमुख पिकाचे दर सध्या कोसळत असताना तुरीचे दर वाढत असून गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात वाढ झालीये तुरीचे दर आठ हजारांवर पोहचले आहे. आणखी दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकीकडे तुरीच्या उत्पादनात घड झाली असून अशात तूरीच्य भावात वाढ होताहेत त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

- राज्य शासन आणि याचिकाकर्त्याचा संस्थेला २ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश

- मराठी शाळा बंद होण्याची समस्या केवळ नागपूरपुरती मर्यादित नसल्याचे नागपुर खंडपीठाचे निरीक्षण

- शाळा आणि मराठी भाषा वाचवायची असेल तर शासनाकडे ठोस ‘ब्लू प्रिंट’ असणे गरजेचे

अमृता फडणवीस यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारतींवर गुन्हा दाखल करावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद, हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचाकडे केली. या मागणीचे निवेदन स्वीकारत पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली असून, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम

शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे

माघारीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील लढतींचे अंतिम चित्र समोर

जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार उभे राहिले आहेत

इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासूनच माघारीच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते

पंचायत समितीसाठी एकूण १,११८ इच्छुकांनी १,४२४ अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या तीन दिवसांत पहिल्या दिवशी १२, दुसऱ्या दिवशी २४, तर अखेरच्या दिवशी तब्बल ५५४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. परिणामी १४६ जागांसाठी ५२८ उमेदवार शिल्लक राहिले असून, त्यामध्ये २५४ महिला आणि २७४ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

हवामानात सातत्याने चढ-उतार

गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने चढ-उतार होत असताना आता हवामान लक्षणीय बदल झाला आहे.

ऐन जानेवारीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांसह हवामान विभागानेही वर्तवली आहे

राज्यातील सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे जानेवारीत कमाल-किमान तापमानात सातत्याने चढ-उतार झाले आहेत.

त्यामुळे कधी थंडी वाढल्याचे, तर कधी थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. आता पुन्हा एकदा हवामान बदल्याने तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभावामुळे पावसाची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com