Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाचा भोगळ कारभार, प्रवाशांना दोन वेळा तिकीट घेण्याची वेळ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News Updateसाम टीव्ही मराठी

Pune: एसटी महामंडळाचा भोगळ कारभार, प्रवाशांना दोन वेळा तिकीट घेण्याची वेळ

पुणे -

एसटी महामंडळाचा भोगळ कारभार

प्रवास्यांना मनस्ताप, दोन वेळा तिकीट घेण्याची वेळ

अलिबागवरून पुण्याला निघालेल्या एसटी बसमधील प्रकार

मशीनमधील QR कोडवर पैसे ऑनलाईन सेंड करून देखील तिकीट मिळेना

कंडक्टर घेत आहेत स्वतःच्या अकाउंटवर पैसे

अनेक प्रवास्यांना काढावे लागले दोन वेळा तिकीट

Kolhapur: शस्त्र तस्करी प्रकरणात मध्यप्रदेशात छापा, कारागिरीला अटक

कोल्हापूर -

- शस्त्र तस्करी प्रकरणात मध्यप्रदेशात छापा, कारागिरीला अटक

- मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात गावठी पिस्तुले बनवणाऱ्या कारागिराला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- सरनाम बरनाला असे या कारागिराचे नाव असून संशयताकडून दोन लाख रुपये किमतीची चार पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काही दिवसांपूर्वी मनीष नागोरी या शस्त्र तस्कराला अटक केली होती त्याच्या चौकशीत तो मध्य प्रदेशातून पिस्तुले आणत असल्याची माहिती समोर आली होती.

- पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दोन पदके मध्य प्रदेशात रवाना केली होती.

Nashik: हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान नाशिकला मिळवून दिला

नाशिक -

- हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान नाशिकला मिळवून दिला आहे.

- नाशिकच्या भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत त्याने कुस्तीचे धडे गिरवले होते

- दरम्यान कालच्या त्याच्या या विजयानंतर भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेबाहेर कुस्तीप्रेमींकडून ढोलताशाच्या तालावर नृत्य करत, फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.

- पहिला महाराष्ट्र केसरीचा किताब 2020 मध्ये पटकवल्यानंतर 6 वर्षातच दुसरा मान त्याने मिळवलाय..

Kolhapur: गॅस सिलेंडरनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी

कोल्हापूर -

गॅस सिलेंडरनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये अनेक पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळेना

पेट्रोल- डिझेल संपणार असल्याच्या भीतीने नागरिकांच्या पेट्रोल पंपावर रांगा

भुदरगड आणि कागल तालुक्यात नागरिकांच्या रात्री उशिरापर्यंत पेट्रोलसाठी गर्दी

Nagpur: वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नकार

नागपूर -

- वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नकार

- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्च्यावर ठाम...

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

- संविधान चौकात सभा घेऊन निवेदन द्या, पोलिसांच म्हणणं,

- संघ मुख्यालय अतिसंवेदनशील, सुरक्षा कारणास्तव पोलिसानी परवानगी नाकारली

Pune: हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती, सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी

हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी

सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत घेतली कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती

Mumbai: मुलुंडमध्ये नशेच्या आहारी जाऊन 3 जणांवरती वार

मुंबई -

- मुलुंडमध्ये नशेच्या आहारी जाऊन तीन जणांवरती वार

- मुलुंड साई प्रेस आणि मुलुंड कॉलनी येथे ही घटना घडली

- अजित पवार गटातून नगरसेवक साठी उभे असलेले सज्जू मलिक यांचे भाऊ युसुफ मलिक याचा मुलगा सुलतान ने केले वार

- नशेच्या आहारी जाऊन करण्यात आले वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com