Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६, रोहित पवार यांची पत्रकार परिषद, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

जालन्यात 156 पोलिस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रियेला होणार सुरुवात

जालन्यात पोलिस दलातील 156 रिक्त पोलिस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी प्रशासन सज्ज झाला आहे. 156 जागांसाठी तब्बल 9 हजार 745 जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान भरती प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मैदानाची चाचणी इन कॅमेरा घेतली जाणार असून तब्बल 250 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहेत. मैदानी चाचणी पोलिस मैदान येथे होणार असून मैदानी चाचणी पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. शिवाय ड्रोनव्दारे मैदानी चाचणी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले जाणार आहे. दरम्यान पोलिस भरती प्रक्रिये दरम्यान कोणताही गैर प्रकार होणार नाही. त्यामुळे जर कोणी पैसे घेऊन उमेदवारांची दिशाभूल करत असेल तर या संदर्भात तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी अस आवाहन जालन्याचे अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केलं आहे.

धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी,अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड

आगामी काळातील निवडणूका आणि पक्षविस्ताराच्या पाश्र्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.कळंब मधील शिवसेना नेते अजित पिंगळे यांची धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहेत.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे.संघटनात्मक पातळीवर हे बदल केले जातात अशी माहीती शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनी दिलीय.

सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युती

सांगली महापालिका मध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता स्थापन होणार आहे.. आज भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीचा आज महापौर व उपमहापौर उमेदवारांच्या निवड पार पडणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. तसेच महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची देखील चंद्रकांत पाटलांकडून घोषणा करण्यात आली आहे. भाजपाकडुन महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये नावांची घोषणा करण्यात आली होती.

भाजप पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस आमदार विकास ठाकरेचा फोटो, महापौर-उपमहापौर बॅकड्रॉपवर विकास ठाकरे झळकले

- भाजप पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस आमदार विकास ठाकरेचा फोटो, महापौर-उपमहापौर बॅकड्रॉपवर विकास ठाकरे झळकले

- मोदी-शहा यांच्या रांगेत ठाकरे यांचा फोटो, भाजपच्या आमदारांसोबत काँग्रेस नेत्याचे छायाचित्र

- दोन्ही पक्षांत चर्चांना उधाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

- भाजपचे स्पष्टीकरण आमदार म्हणून निमंत्रण होते, मग इतर पक्षांच्या अध्यक्षांचे फोटो का नाहीत?

- मित्रपक्षांच्या शहराध्यक्षांचा फोटो गायब, विकास ठाकरेंच्या लोकप्रियतेचा राजकीय अर्थ?

- महापालिकेच्या कार्यक्रमात राजकीय चर्चेला उधाण...

म्हाडाच्या 4186 सदनिकांची आज सोडत....

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागाची आचारसंहितेमध्ये अडकलेली सोडत आज जाहीर होणार आहे पुणे विभागातील पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर आणि सांगली येथील 4186 सदनिकांचा यामध्ये समावेश आहे.

म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थित पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही सोडत दुपारी बारा वाजता होणार आहे.

चंद्रपूरचा महापौर आज ठरणार,  अकरा वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात

चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार आहे. महापौर पदासाठी आज दुपारी 11 वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप, ठाकरे शिवसेना यांनी या पदावर दावा केला असून, अंकांची जुळवाजुळव करण्यात सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. महापालिकेत काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. पाठोपाठ 23 जागांसह भाजप असून, ठाकरे सेनेचे वंचितसह आठ सदस्य आहेत. सत्तेचे गणित ठाकरे सेनेच्या हाती असल्याने महापौर पद आम्हाला द्या, अशी ठाम भूमिका ठाकरे सेनेने घेत इतरांना पाठिंबा देण्यास नकार दिला. पण तरीही या सेनेची चर्चा काँग्रेस आणि भाजपसोबत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. यावर आता कोणता तोडगा निघतो, हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाचे चित्र अजूनही धूसर आहे.

रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना सत्तेत बसणार - गोगावले

रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना सत्तेत बसणार असल्याचा युक्तीवाद मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. दक्षिण रायगडमध्ये भाजपसोबत युती नसली तरी उत्तर रायगडमध्ये आम्ही भाजपसोबत युतीत निवडणुका लढवल्या आहेत आणि तेथेच भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्याच सांगत शिंदेसेना सत्तेत बसणार असल्याचा युक्तीवाद गोगावले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा येणार नवी मुंबईत

‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची आरम्भता की ‘अरदास’ संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली.

ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती

- ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती,ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस

- कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंच्यातवर प्रशासक नेमच्याचा राज्य शासनाच्या निर्णयावर नागपूर खंडपीठाचा ब्रेक,

- जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रश्न, निवडणूक न घेता प्रशासक नेमण्याच्या आदेशाला आव्हान

- २३ जानेवारीच्या शासन परिपत्रकावर न्यायालयाची कारवाई, लोकशाही रचनेवर परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

- कार्यकाळ संपताच निवडणूक होणे आवश्यक, प्रशासक नेमत वर्षभर निवडणुका टाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

- कोरोना काळाचा दाखला सध्याच्या परिस्थितीत ग्राह्य नाही, ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौऱ्यावर

- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे..

- नागपुरात राष्ट्रपती "ब्रह्माकुमारीज" या संस्थेच्या वतीने आयोजित "एकात्मता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ" या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत..

- हा कार्यक्रम 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता नागपूर जवळच्या जामठा येथील "विश्वशांती सरोवर" परिसरात आयोजित करण्यात येणार आहे...

- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सुद्धा राष्ट्रपती यांचा संभाव्य दौरा आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com