Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नसल्यानं नैराश्य, विषारी औषध पिऊन मराठा आंदोलकानं आयुष्य संपवलं

Beed Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नसल्याचा उदासीनतेतून विषारी औषध प्राशन करुन एका ३९ वर्षीय मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Beed Maratha Reservation
Beed Maratha Reservationsaam tv
Published On
Summary
  • बीडमध्ये मराठा आरक्षण न मिळाल्याने संतोष वळे यांची विष प्राशन करून आत्महत्या केली.

  • आरक्षणासाठी अनेक आंदोलनात सहभागी झालेल्या संतोष वळेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • या घटनेमुळे बीडमधील आहेर धानोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Maratha Reservation : बीडच्या आहेर धानोरा येथे एक धक्कादायक घडली आहे. बीड तालुक्यात एका ३९ वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत विषारी औषध प्राशन केले होते. या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या उदासीनतेतून संतोष वळे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. बीडच्या आहेर धानोरा गावाचे संतोष वळे हे रहिवासी होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले होते. आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांनी विषप्राशन केले होते.

Beed Maratha Reservation
Pooja Gaikwad : माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणातील डान्सरचे रील्स व्हायरल, पूजा गायकवाडचे फॉलोवर्स पाचपट वाढले

मराठा आरक्षण मिळत नसल्याची संतोष यांना खदखद होती. यातून त्यांनी विषारी औषध प्राशन केले. 'आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही यामुळे येणारा काळ कठीण आहे', असे संतोष शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलांना वारंवार सांगत असायचे. ते सतत निराश असायचे असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

Beed Maratha Reservation
Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

नैराश्यातून संतोष वळे यांनी २ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना बीडमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) संतोष वळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. संतोष यांच्या पश्चात पत्नी पल्लवी वळे, दोन लहान मुले, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

Beed Maratha Reservation
Beed : मोठी बातमी! माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधाची डान्सर पूजा गायकवाडची कबुली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com