Maratha Reservation: सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून कठोर कारवाई होणार

Maratha Reservation News: शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला गालबोट लावून ठिकठिकाणी जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
 Maratha Reservation Police action will be taken against people who post offensive posts on social media
Maratha Reservation Police action will be taken against people who post offensive posts on social mediaSaam TV
Published On

Maratha Reservation News

शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला गालबोट लावून ठिकठिकाणी जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, कायदा हातात घेतल्यास गुन्हे दाखल करू, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Maratha Reservation Police action will be taken against people who post offensive posts on social media
Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं; मराठा आरक्षणावर दीड तास चर्चा, आज मोठा निर्णय होणार?

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आवाहनानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे.

मात्र, शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट देखील लागलं आहे. समाजकंटकांनी आंदोलनाचा फायदा घेत काही ठिकाणी दगडफेक तसेच जाळपोळ केल्याचं पोलिसांचं (Police) म्हणणं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू व्हिडीओ पोस्ट केल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.

पोलिसांनी अशा २९ आक्षेपार्ह व्हिडीओचा शोध घेतला असून हे व्हिडीओ कुणी पोस्ट केले याचा तपास केला जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील समाजकंटकांना इशारा दिला आहे. सर्वांना शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे, पण हिंसा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा लोकांवर पोलिसांकडून कलम ३०७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जाळपोळ करणारी लोक सरकारमधीलच आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे. तुम्हाला कलम ३०७ दाखल करायचं आहे ना, करा. तुम्ही ३०७ चे किती गुन्हे दाखल करता, तेच बघायचं आहे. दांडका घेऊन आलात तर आम्हालाही मर्यादा ओलांडावी लागेल, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

 Maratha Reservation Police action will be taken against people who post offensive posts on social media
Sandeep Kshirsagar Post: 'जाळपोळीची घटना घडली, तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब घरातच होते', संदीप क्षीरसागर यांनी सांगितला 'तो' भयावह प्रसंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com