Sandeep Kshirsagar Post: 'जाळपोळीची घटना घडली, तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब घरातच होते', संदीप क्षीरसागर यांनी सांगितला 'तो' भयावह प्रसंग

Sandeep Kshirsagar Emotional Post: 'जाळपोळीची घटना घडली, तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब घरातच होते', संदीप क्षीरसागर यांनी सांगितला तो भयावह प्रसंग
Sandeep Kshirsagar Emotional Facebook Post
Sandeep Kshirsagar Emotional Facebook PostSaam Tv
Published On

Sandeep Kshirsagar Emotional Facebook Post:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं सोमवारी पाहायला मिळालं. यातच विविध पक्षाची कार्यालय आणि घरांना हिंसक जमावाकडून जाळपोळ केल्याच्या घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर आणि कार्यालयाचा ही समावेश आहे.

त्या भयावह प्रसंगाबद्दल संदीप क्षीरसागर यांनी आता फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपल्या अनुभव सांगितला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी, माझी मुलं आणि सर्व कुटुंब घरात होतं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sandeep Kshirsagar Emotional Facebook Post
Ramdas Athawale: आगामी निवडणुकीत आम्हाला संधी न दिल्यास भाजपला पाडणार, आठवले गटाचा इशारा

फेसबुक पोस्टमध्ये ते काय म्हणाले?

सोमवारी घडलेल्या घटनेबद्दल पोस्ट करताना संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत की, ''काल बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते. पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले आहेत, ''मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल''

Sandeep Kshirsagar Emotional Facebook Post
Contract Recruitment News: मोठी बातमी! कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; वाचा शासन निर्णय जशाचा तसा

पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं की, ''मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा.''

ते त्यांनी लिहिलं की, ''सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com