Ramdas Athawale: आगामी निवडणुकीत आम्हाला संधी न दिल्यास भाजपला पाडणार, आठवले गटाचा इशारा

Republican Party of India (Athawale) On BJP: आगामी निवडणुकीत आम्हाला संधी न दिल्यास भाजपला पाडणार, आठवले गटाचा इशारा
Republican Party of India (Athawale) On BJP
Republican Party of India (Athawale) On BJPSAAM TV
Published On

>> अभिजित देशमुख

Republican Party of India (Athawale) On BJP:

''भाजपची आरपीआय आठवले गटासोबत युती असताना देखील भाजपकडून कार्यक्रमांमध्ये आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना डावललं जातं. केंद्रीय मंत्री आठवले यांचे फोटो लावले जात नाहीत. इथून पुढे मानसन्मान दिला नाही, तर भाजपच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू,'' असा इशारा आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी दिला आहे.

आरपीआय आठवले गटाचा कल्याण मधील अत्रे रंगमंदिरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत. या मेळाव्यात आरपीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आठवले गटाच्या उमेदवारांना संधी दिली नाही तर, भाजपचा उमेदवार पाडू. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Republican Party of India (Athawale) On BJP
Contract Recruitment News: मोठी बातमी! कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; वाचा शासन निर्णय जशाचा तसा

या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर यांनी गेल्या नऊ दहा वर्षापासून आरपीआय आठवले गट व भाजपची युती आहे. मात्र भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले नाही. भाजपच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा फोटो देखील टाकला जात नाही. आठवले गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जात नाहीत, असं दयाल बहादुरे म्हणाले. (Latest Marathi News)

ते म्हणाले, युती असली तरी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जात नाही. इथून पुढे जर भाजपाने मानसन्मान दिला नाही तर, भाजपच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला.

Republican Party of India (Athawale) On BJP
Jarange Patil Latest News: मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही, सरकारने उद्याच अधिवेशन बोलवावं: मनोज जरांगे पाटील

पुढे बोलताना बहादुरे यांनी येणाऱ्या लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकांमध्ये आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना संधी द्या. त्यांना निवडून आणा, जर संधी दिली नाही तर, भाजपच्या उमेदवारांना पाडू, असा इशारा त्यांनी दिला. या कार्यकर्ता मेळाव्यात आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा विरोधात नाराजीचा सूर लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com