Manoj Jarange Patil: 'उपोषण संपू द्या, सगळ्यांचाच हिशोब घेतो'; मनोज जरांगे भडकले

Manoj Jarange Patil Criticized Maratha Leaders Appeal To CM Eknath Shinde: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधला आहे. समाजासाठी उपोषण करतोय पण त्याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांनाच नसल्याची टीका जरांगे पाटलांनी केलीय.
मनोज जरांगे
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही जालना

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांवर टीका केलीय. मी समाजासाठी उपोषण करतोय, याचा त्रास माझ्या शरिराला होत आहे, परंतु याची जाणीव मराठा नेत्यांनाच नसल्याची खंत जरांगे पाटलांनी व्यक्त केलीय. उपोषण केल्याने काय हाल होतात, आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाचे काय हाल होतात, हेच त्यांना माहित नाही असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावला आहे.

जरांगे पाटील नेमकं काय बोलले?

प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळांची भाषा एकच (Maratha Reservation Issue) आहे. फक्त माझं उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमधून दिलाय. मराठ्यांना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात. आरक्षण लवकर द्या, उशीर करू नका. समाजाच्या हाल अपेष्टा झाल्यानंतर आरक्षण देऊ नका, असं आवाहन जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय.

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद

आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जालन्यामध्ये जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा २० जुलैपासुन आरक्षणाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक अंतरवाली सराटीत दाखल झालं होतं. दिवसेंदिवस मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापतच आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता (CM Eknath Shinde) आहे.

मनोज जरांगे
VIDEO: सभागृहात चर्चा करा अन्यथा राजकारणात या; प्रसाद लाड यांची Manoj Jarange यांच्यावर खोचक टीका

जरांगे पाटलांचा सवाल

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट (Maharashtra Politics) घेतली. मात्र, त्यांच्या भेटीदरम्यान काय झालं हे मला सांगता येणार नाही. नेमकी त्यांची भेट कशासाठी झाली, हे मला माहित नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सिद्ध करायला एवढे दिवस लागत नाही. एका ओळीचा शासन निर्णय करायला एवढा वेळ लागत असतो का? असा सवाल देखील जरांगे पाटलांनी सर्वपक्षीय बैठकीवर विचारला आहे.

मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: 'फोडाफोडी, मॅनेज करणं, आमदारकी देतो...ट्रॅप रचू नका; मनोज जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com