डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही जालना
सरकारला कधीच मराठ्यांची कधीच गरज नव्हती, त्यांना फक्त मराठा मतदान हवंय, असा टोला आंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंनी सरकारला लगावला आहे. 'फोडाफोडी, मॅनेज करणं, आमदारकी देतो असा ट्रॅप रचू नका, असा इशारा मनोज जरांगेंनी पाटलांनी प्रसाद लाड यांना दिलाय. आरक्षणावर चर्चा करतात की दंगली घडवतात, असाही गंभीर आरोप जरांगे पाटलांनी सरकारवर केलाय.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मला मॅनेज करायला लागले आहेत, शेवटी त्यांनी राजकारणाची जात दाखवली अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर केलीय. मागील १० महिन्यापांसून आम्ही आमचं आरक्षण (Maratha Reservation) मागतोय, पण तुम्ही देत नाही. त्यामुळे आम्हाला तुम्हाला पाडून तिथं बसावं लागेल, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. सरकारला जीआर काढायला सांगा. भाऊ म्हणून काड्या करू नका, आतून ट्रॅप रचू नका, आमच्या विरोधात एकेक उतरू नका. गोड बोलून काटा काढू नका, असा इशारा जरांगेंनी लाड यांना दिलाय.
छगन भुजबळांवर गंभीर आरोप
छगन भुजबळ १०० टक्के दंगली घडवून आणणार असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) केलाय. आरक्षणाच्या प्रश्नावर अमित शहा कधी लक्ष घालणार? ते मोठे लोक आहेत. मोदी शिर्डीत आले होते, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा होती, अशी खदखद देखील जरांगेंनी बोलून दाखवली आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. तुम्ही विनाकारण कोणताही अर्थ काढू नका. आम्ही तुमच्या समाजाचा आदर करतो, असं देखील मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी बांधवांना उद्देशून वक्तव्य (Maharashtra Politics) केलंय.
उपोषणाचा तिसरा दिवस
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासुन पुन्हा उपोषण सुरू केलंय. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून (Prasad Lad) आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली होती. परंतु डेडलाईन संपली तरी सरकारकडून कोणतीही हालचाल नसल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.