VIDEO: सभागृहात चर्चा करा अन्यथा राजकारणात या; प्रसाद लाड यांची Manoj Jarange यांच्यावर खोचक टीका

BJP MLA Prasad Lad To Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरून दिवसेंदिवस वातावरण तापत चाललं आहे. मनोज जरांगे पाटील यांना प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा आरक्षणावरून महायुती सरकारवर टीका करत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. प्रसाद लाड यांनी जरांगेंना विनंतीवजा सल्ला दिल्याचं समोर आलंय. राजीनामा द्यायला तयार आहे, तुम्हाला निवडणून आणू असं लाड यांनी जरांगेंना म्हटलं आहे.

जरांगेंना विधानमंडळात यायचं असेल तर राजीनामा देतो, असं विधान प्रसाद लाड यांनी केलंय. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा. एकदा तरी तुम्ही मला चर्चाल बोलवा, नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या अशी खोचक टीका प्रसाद लाड यांनी केलीय. एकदा आपल्या सहकाऱ्यांसोबत आपला मुद्दा मांडा, आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com