Maratha Reservation : जरांगेंच्या उपोषणाला ६ वाजेपर्यंतच परवानगी, पुढे काय होणार? वाचा सविस्तर

Maratha Reservation agitation : मनोज जरांगेंच्या उपोषणाला ६ वाजेपर्यंतच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ६ वाजेनंतर जरांगे काय करणार,याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange News
Maratha ReservationSaam tv
Published On
Summary

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन

सरकारकडून आंदोलनासाठी फक्त संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी

मनोज जरांगेंनी कोर्ट आणि सरकारकडे बेमुदत आंदोलनाची परवानगी

मुसळधार पावसातही मराठा आंदोलकांचा निर्धार कायम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वात वादळ सकाळी मुंबईत धडकलेय. राज्यभरातून शेकडो गाड्या अन् हजारो मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत दाखल झालाय. आझाद मैदानावर सकाळी १० वाजता मनोज जरांगेंनी ही शेवटची लढाई असल्याचे सांगत एल्गार पुकारला. मला गोळ्या झाडा, पण आंदोलन केल्याशिवाय परतनार नाही, असा निर्धार त्यांनी केला. आझाद मैदान अन् मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झालीय. जिकडे पाहावे तिकडे मराठा समाज दिसतोय. सीएसएमटी स्थानकावर तर मुंग्यासारखी गर्दी झाली आहे. पण संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न यासाठी पडलाय, कारण फडणवीस सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचीच वेळ दिली आहे.

Manoj Jarange News
Gadchiroli News : ऐन गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

मुंबईमध्ये एकसारखा धो धो पाऊस कोसळतोय. सकाळपासून रिपरिप सुरूच आहे, दुपारी पावसाचा जोर वाढला अन् मराठा आंदोलकांना याचा फटका बसला. गावखेड्यातून आलेल्या मराठ्यांवर मुंबईमध्ये पावसाचे संकट ओढावले. पण मराठाही तितकाच कणखर आहे. पावसामध्येही मराठे आझाद मैदानावर तळ ठोकून आहे. आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, असा निर्धार प्रत्येक मराठ्यांनी केलाय. सरकारने सहकार्य करावे, बेमुदत आंदोलनाला परवानगी द्यावी, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. सरकारने सहकार्य केले तर आपणही सहकार्य करायचेच, असा रोख जरांगेंचा असल्याचे सकाळच्या भाषणातून दिसून आला.

आंदोलनाला परवानगी मिळाली नाही तर पुढे काय ?

आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कोर्ट अन् सरकारकडे अर्ज केलाय. वकिलांमार्फत कोर्टातही लढा दिला जातोय. आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. पण जर परवानगी दिली नाही, तरीही मी आरक्षण मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, अथवा कोर्टाकडून आझाद मैदानात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला परवानगी मिळू किंवा न मिळो... जरांगे हटणार नाहीत. ते आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम राहतील, असा अंदाज वर्तवला जातोय.

Manoj Jarange News
Romario Shepherd : नाद करायचा नाय आमचा! पठ्ठ्याने एका चेंडूत कुटल्या २० धावा, एका पाठोमाग ३ षटकार, VIDEO

भगव्या वादळापुढे निसर्गाचे वादळही फिके पडले -

मराठे मुंबईत धडकले अन् काही दिवसांपासून शांत असणाऱ्या पावसाने हजेरी लावली. मुंबईमध्ये गावखेड्यातून आलेल्या मराठ्यांना धोधो पावसाचा सामना करावा लागतोय. पण निसर्गाच्या वादळापुढे मराठे छातीठोकपणे उभे राहिलेत. धो धो पाऊस पडत असताना आझाद मैदानावर मराठ्यांचा आरक्षणाचा लढा सुरूच आहे. काही मराठ्यांनी सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेतला. पण मुंबईतच थांबण्यावर ठाम राहिले. आता सरकारकडून काय भूमिका घेतली जातेय? आरक्षणाला मंजुरी मिळणार का? बेमुदत आंदोलनाची परवानगी दिली जाणार का? याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

Manoj Jarange News
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं; मनोज जरांगे मुंबईत, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पहिली प्रतिक्रिया

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष -

मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजतेय. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत विखे पाटील चर्चा करणार असून आंदोलन माघारी घेण्याची मागणी करतील, अथवा वेळ मागितला जाईल. पण दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मागणीवर ठाम राहतील, अथवा चर्चा ऑन कॅमेराच करण्यात येईल, अशी भूमिका घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com