Gadchiroli News : ऐन गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli News update : ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी मोठी कारवाई केली. गडचिरोली पोलिसांनी ४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
Gadchiroli Police news
Gadchiroli Police Saam tv
Published On
Summary

गडचिरोलीच्या कोपर्शी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

या चकमकीत ४ नक्षलवादी ठार

पोलिसांकडून घटनास्थळी शस्त्रसाठा जप्त

गणेशोत्सव काळात घटना घडल्याने परिसरात खळबळ

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

राज्यात एकीकडे धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आलं. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात कोपर्शीच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. त्यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जंगलात शस्त्रसाठा ही सापडला असून अजूनही चकमक सुरू आहे.

Gadchiroli Police news
Maharashtra Politics : राज्यात राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला बडा मोहरा; शिवसेनेची ताकद वाढणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 आणि इतर माओवादी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ QAT ची ०२ पथके जंगलात रवाना करण्यात आली.

प्रचंड पावसादरम्यान दोन दिवस पोलीस पथके आज सकाळी जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवली. तर माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिलं.

Gadchiroli Police news
Shocking : ७ मुलांची आई भाच्याच्या प्रेमात झाली खुळी; नवऱ्याकडून ३ लाख घेऊन पळाली, दुसऱ्या गावात संसारही थाटला

आठ तास चाललेल्या चमकीनंतर परिसरात शोध घेण्यात आला. त्यावेळी ४ जहाल माओवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यात १ पुरुष आणि ३ महिलांचे मृतदेह आढळले. तसेच घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल आणि 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. या भागातील उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे.

Gadchiroli Police news
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची दुतोंडी भूमिका; भारतावर लावला ५० टक्के टॅरिफ अन् रशियाशी केली सीक्रेट डील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com