मराठा, ओबीसींनंतर आणखी एक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार? मंत्र्याचा सरकारला इशारा

Maharashtra Nomadic Tribes Reservation: मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. अशात भटक्या आणि विमुक्त जमातींच्या आरक्षणावरून आंदोलन होऊ शकते, असा इशारा मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.
Maharashtra Reservation Row Maratha-obc Aftermath, Minister Sanjay Rathod Warns Government
Maharashtra Reservation Row Maratha-obc Aftermath, Minister Sanjay Rathod Warns Governmentsaam tv
Published On
Summary
  • आता भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत

  • मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

  • मंत्री संजय राठोड यांनी भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते उद्या 1 सप्टेंबर रोजी आरक्षणासाठी मुंबईत धडक मोर्चा काढणार आहेत. मराठा-ओबीसी समाजानंतर आणखी एक समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

Maharashtra Reservation Row Maratha-obc Aftermath, Minister Sanjay Rathod Warns Government
Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

यावरून राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी थेट सरकारला इशारा दिलाय. राज्यातील भटक्या विमुक्तांच्या आरक्षण प्रश्नी आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिलाय. थेट सरकारमधील मंत्र्यानेच इशारा दिल्याने आरक्षण प्रश्न अधिकच पेटणार असल्याची चिन्हे आहेत. मराठा समाज, ओबीसी आरक्षणासाठी लढतोय. मात्र आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे.

Maharashtra Reservation Row Maratha-obc Aftermath, Minister Sanjay Rathod Warns Government
Maratha Reservation: राज्यात किती कुणबी नोंदी मिळाल्या? अधिकृत आकडा आला समोर, त्या प्रत्येकाला मिळणार मराठा आरक्षण

आरक्षण मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढू, ज्या समाजाला कायम गुन्हेगार म्हणून पाहिले जायचे, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करत आहोत, असा इशारा राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी दिलाय. अजूनही गावागावात आणि खेड्यापाड्यात स्वातंत्र्यानंतरही या भटक्या विमुक्त समाजाचे हाल होतायेत.

भटक्या विमुक्त समाज हा विखुरलेला आहे. या समाजाला सुविधा नाहीत. ज्या प्रकारे मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाहीये. पण या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच आमची मागणी आहे. आम्हीही आमच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याच्या तयारीत आहोत, असे संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणालेत.

दरम्यान अंतरवली सराटीत जरांगे यांचं शेवटचं आणि निर्णायक आंदोलन सुरू आहे. गेल्या तीन दिवसापासून जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज संध्याकाळपर्यंत जरांगे यांच्या मागण्यावर तोडगा काढू असं सरकारकडून सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com