Maratha Wedding : हुंडा बंद, २०० लोकांत लग्न; मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर

Marriage Code Of Conduct : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाने नवीन आचारसंहिता जाहीर केली आहे – हुंडा बंद, २०० लोकांत साधे लग्न, प्री-वेडिंग शूट बंद. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल.
Marriage
Marriage Saam tv
Published On

Maratha community announces wedding code of conduct : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याची जोरदार चर्चा सुरू झाली. हुंडा अन् लग्नातील इतर गोष्टीवर मराठा समाजाने पुरोगामी पाऊल उचलले आहे. मराठा समाजाने लग्न समारंभांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे. नगरमध्ये त्यासाठी विशेष बैठक बोलवण्यात आली होती. ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, ह. भ. प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते.

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर खडबडून जागं झालेल्या मराठा समाजामधील लोकांनी अहिल्यानगरात बैठक घेत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. लग्न साध्या पद्धतीने आणि १०० ते २०० लोकांमध्ये करा, हुंडा प्रथा बंद करा, प्रिवेडींग शूट बंद, यासारखे नियम आचारसंहितेत ठरवण्यात आले आहे. या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

Marriage
Maratha Community : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाची महत्वाची बैठक; चर्चेत कोणते ठराव मंजूर झाले? वाचा

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजातील लग्न समारंभ साधे, कमी खर्चाचे आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारे असावेत, असा या निर्णयामागील उद्देश आहे. या नियमांचे पालन न केल्यास सामाजिक बहिष्काराची कारवाई होऊ शकते, असे समितीने स्पष्ट केले आहे. यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि आर्थिक ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या आचारसंहितेला समाजातील सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. पाहूयात आचारसंहितामध्ये नेमकं काय काय ठरलं?

Marriage
Vaishnavi Hagwane : दोन मोबाईल, एक लॅपटॉप, CCTV फुटेजचा DVR, निलेश चव्हाणच्या घराची झडती; हगवणे आणखी गोत्यात
  • मराठा समाजाने मुला-मुलींचा लग्र सोहळा १०० ते २०० अशा मर्यादित निमंत्रितांमध्येच केला जावा.

  • काही लोक दुपारी लग्न विधी करतात आणि सायंकाळी पुन्हा एकदा मंगलाष्टक, जेवणावळी करतात. त्या ऐवजी संध्याकाळी फक्त स्वागत समारंभ ठेवावा. म्हणजे नातेवाईक, स्नेही त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन भेट घेऊन जेवण करून जातील.

  • डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंताचा वापर करावा.

  • प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये, कसल्याही परिस्थितीत लग्र वेळेवरच लावावे.

  • नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये, कर्ज काढून लगात खर्च करू नये.

  • नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.

  • लग्रात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांयावेत. पाहुण्यांचे फेटे व इतर सत्कार बंद करावेत.

  • लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात साड्या, भेटवस्तू देऊ नयेत. त्या ऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.

  • भांडी, फर्निचर (रुखवत) देण्याऐवजी रोख रक्कम वधूच्या नाणे बँकेत डिपॉझिट करावी. लग्रात

  • लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये. लग्रात हुंडा देऊ, घेऊ नये. खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.

  • लग्रानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मुलीशी मोबाईलचा वापर गरजे पुरताच करावा.

  • पैशासाठी सुनेचा छळ करू नये.

  • भोजन प्रसंगी, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी किंवा जेवणात ७ पेक्षा जास्त पदार्थ नकोत.

  • लग्ग आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आर्शीवाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा, गरज वाटल्यास श्रद्धांजलीसाठी वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com