Vaishnavi Hagwane : दोन मोबाईल, एक लॅपटॉप, CCTV फुटेजचा DVR, निलेश चव्हाणच्या घराची झडती; हगवणे आणखी गोत्यात

Vaishnavi Hagwane Death Case : निलेश चव्हाण २१ मेपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अटकेची कुणकुण लागताच चव्हाण फरार झाला. चार राज्यं ओलांडून तो नेपाळमध्ये पोहोचला. एका लॉजमधून पोलिसांनी त्याला अटक केली.
Vaishnavi Hagwane Death Case
Vaishnavi Hagwane Death CaseSaam Tv News
Published On

पुणे (पिंपरी-चिंचवड) : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरुन अटक झाल्यानंतर आता पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. पोलिसांनी काल निलेश चव्हाणला अटक केली. त्याला नेपाळहून पुण्याला आणण्यात आलं. आज पोलीस त्याला कर्वेनगरमधील त्याच्या घरी घेऊन गेले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबाने निलेश चव्हाण याच्याकडे सोपवलं होतं. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा, तिच्या कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप चव्हाणवर आहे.

निलेश चव्हाण २१ मेपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अटकेची कुणकुण लागताच चव्हाण फरार झाला. चार राज्यं ओलांडून तो नेपाळमध्ये पोहोचला. एका लॉजमधून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आलं. आज पोलीस त्याला घेऊन त्याच्या घरी पोहोचले. त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. चव्हाणच्या घरात लता आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आहेत. चव्हाणने दोन्ही मोबाईल तिजोरीत ठेवले आहेत. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचा डेटा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या केससंदर्भात महत्त्वाची माहिती त्यांच्या मोबाईलमधून मिळू शकते. वैष्णवीचा सासरी छळ सुरु होता. त्याचे पुरावे दोघींच्या मोबाईलमध्ये असू शकतात. वैष्णवीचा सासरी अतोनात छळ झाला. या सगळ्याची सूत्रधार करिश्माच असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या संदर्भातील वैष्णवीची ऑडिओ क्लिप महत्त्वाचा पुरावा आहे. त्यानं तिनं करिश्मा उर्फ पिंकी ताईकडून होत असलेल्या छळाची माहिती दिली आहे.

Vaishnavi Hagwane Death Case
Vaishnavi Hagawane: निलेश चव्हाणच्या घरात पोलिसांचा तपास, ३ मोबाईल जप्त, अन्य दोन फोन कुणाचे? मोठी माहिती समोर|VIDEO

तर दुसरीकडे, वैष्णवी हगवणे प्रकरणात अटकेत असलेला आरोपी निलेश चव्हाणच्या घरी आज पुणे पोलीस निलेश चव्हाणला घेऊन दाखल झाले. यावेळी घरामध्ये दोन मोबाईल, एक लॅपटॉप, cctv फुटेजचा dvr आणि काही पेन ड्राईव्ह पोलिसांना सापडले परंतु हा सगळा मुद्देमाल घेऊन जाणारे पंच माध्यमांच्या गराड्यात सापडले. कारण निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांचे दोन वाहन पुढे निघून गेले. मात्र, पंच पाठीमागेच राहिले माध्यमांच्या गराड्यात अडकल्यामुळे या पंचाची चांगलीच पंचायत झालेली पाहायला मिळाली.

दरम्यान, वैष्णवी हगवणे यांच्या मृत्युपूर्वी आरोपी यांच्यापैकी एक आणि निलेश चव्हाण यांचा कॉल झाला होता, त्याचा तपास करायचा आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. निलेश चव्हाण याच्या वकिलांकडून जोरदार प्रतिवाद करण्यात आला. फक्त बाळ त्याच्याकडे होत म्हणून या प्रकरणात नाव घेण्यात आलं आहे, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. पण कोर्टाने निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Vaishnavi Hagwane Death Case
Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास सुस्साट; दादर-प्रभादेवीहून नरिमन पॉईंट अवघ्या काही मिनीटांत; कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com