

जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून काल लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. (Latest Marathi News)
रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याआधी आज राज्यभरातल्या मराठा समन्वयकांची बैठक होणार आहे. होणाऱ्या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली जाणार अशी माहिती समोर आलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून जालन्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांवर बेच्छुट लाठीचार्ज केल्यानंतर बसची तोडफोड आणि जाळपोळ करत निषेध व्यक्त करण्यात आला. आज देखील ७ जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
विरोधकांडून देखील या घटनेवर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठ समाज आरक्षणासाठी मागणी करत आहे. शरद पवार लवकरच आंदोलकांची भेट घेणार आहेत. तर आज संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली आहे. यावेळी संभाजीराजेंना घडलेली घटना सांगताना महिला त्यांच्यासमोर ढसाढसा रडल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.