

Maharashtra Heat wave: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. (Latest Marathi News)
कल्याण डोंबिवलीत उन्हाचा पारा 42 अंशावर
कल्याण डोंबिवली (Dombivli) शहरात काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, सकाळी अकरा वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आज दुपारच्या सुमारास तापमान 42 अंशांवर गेले आहे. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होत असून कल्याण डोंबिवलीकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत.
दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली असून थंड पेयांच्या दुकानावर नागरिकांची वर्दळ वाढत आहे .
नवी मुंबईचा पारा वाढला
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ जाणवत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री गरमी जाणवत आहे. नवी मुंबईतही उन्हाचा कडाका वाढला आहे. नवी मुंबईचे (Navi Mumbai) तापमान 41 अंशांवर गेले आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असल्याने नवी मुंबईकरांच्या जीवाची लाही लाही होत आहे. कडक उन्हामुळे 3 दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्मघाताने 14 जणांचा झाला होता मृत्यू.
राज्यातील तापमानाही चढेच
विदर्भात तर सर्वदूर पारा ४० अंशांच्या वर नोंदला गेला. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. छत्रपती संभाजीनगर येथे ३९.८, बीड येथे ४१.६, कोल्हापूर येथे ३९.१, नांदेड येथे ३९.८, परभणी ४१.७, सांगली ३९.६, सातारा ३८.८, सोलापूर येथे ४१.८, उदगीर येथे ३९.५, नाशिक यथे ३९.१, जळगाव येथे ४१.६ असा तापमानाचा पारा चढा होता.
उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर असा करा उपचार
व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला / त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा / वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी करा.
• व्यक्तिला 'ओआरएस' प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीराला 'रीहायड्रेट' करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या.
• व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे सदैव ध्यानात ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.