आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जागावाटपाचीही तयारी सुरु झाली आहे. याच आगामी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने जालन्यातून मनोज जरांगे यांना उमेदवारी असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीचं त्यांचं आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित केलं आहे. मनोज जरांगे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचदरम्यान, मनोज जरांगे यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीपुढे मांडला. या प्रस्तावावर मनोज जरांगे म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर यांचा मोठेपणा आहे. ते आमच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'माझा राजकारण हा प्रांत नाही. राजकारण माझ्यासमोर मोठा विषय नाही. आरक्षण हा माझ्यासमोरचा मोठा विषय आहे. गृहमंत्री आमच्या समोर संकट उभं करत आहेत. निर्माण केलं आहे. मला हे चक्रव्यूह भेदायचं आहे. ते मी भेदनार आणि बाहेर पडणार, आरक्षण हा माझा अजेंडा आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३ मार्चपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आज बुधवारी मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करण्याच निर्णय घेतला.
'राज्य सरकार सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. मला बदनाम करण्याचं कटकारस्थान केलं जातंय, असं म्हणत जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदाराने मागणी केल्यानंतर मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.