CM Eknath Shinde : जनतेने गॅरंटी दिली आहे,पंतप्रधान हॅटट्रिक करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Latest news :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केले. 'जनतेने गॅरंटी दिली आहे, त्यामुळे पंतप्रधान हॅटट्रिक करणार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमातील सभेत केलं.
CM Eknath Shinde Speech
CM Eknath Shinde SpeechSaamtv
Published On

Eknath shinde Latest news :

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील यवतमाळमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या दौऱ्यादरम्यान आयोजित विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केले. 'जनतेने गॅरंटी दिली आहे, त्यामुळे पंतप्रधान हॅटट्रिक करणार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यक्रमातील सभेत केलं. (Latest Marathi News)

यवतमाळमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

१. गेल्या चार दिवसांत विविध भागात लोकार्पण झालं आहे. महाराष्ट्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेम भावना दिसून येत असल्याने त्यांचे आभार मानतो. लोककल्याणकरी योजनेचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आहेत.

२. राज्यातील 55 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. एक नवीन क्रांती बचतगटाच्या माध्यमातून येणार आहे. देशात महिला गरीब आणि शेतकरी या जाती आहेत. महिला 10 वर्षात महिलांना बळ देण्याचं काम सरकारने केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde Speech
PM Modi Maharashtra : आधी १ रुपयामधील १५ पैसेच लोकांना मिळायचे; काँग्रेसच्या कारभारावर पंतप्रधान मोदींची टीका

३. नेशन फर्स्ट अजेंडा राबवत देशाला अव्वल करणे आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचा मान सन्मान आहे. घर घर मोदी नाही तर आज मन मन मोदी आहे.

CM Eknath Shinde Speech
Share Market : SEBI च्या कठोर धोरणानंतर शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांच्या ६ लाख कोटींचा चुराडा

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

१. अखिल विश्वातील लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी... महाराष्ट्रातील एकमेव शीतल माता मंदिर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नारीशक्तीचं वंदन होत आहे.

२. महिला सशक्तीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. ४७०० कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून १० लाख कुटुंबाना घर देणार आहे.

३. नारी शक्ती वंदन करताना पुरुषाला सोबत महिलेचे नाव घराच्या मालकीत असणार आहे. विदर्भातील 91 प्रकल्पाला कोटी रुपये दिले आहे. कळंब गणपतीला नमन करतो. आज वर्धा ते कळंब रेल्वे सुरु होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com