Share Market : SEBI च्या कठोर धोरणानंतर शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांच्या ६ लाख कोटींचा चुराडा

Stock Market : गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी सेबीने केलेल्या कडक नियमांनंतर शेअर मार्केटमध्ये बुधवाही भंकप आला. यात गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला असून तब्बल ६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
Share Market
Share MarketSaam Digital

Share Market

गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी सेबीने केलेल्या कडक नियमांनंतर शेअर मार्केटमध्ये बुधवाही भंकप आला. यात गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला असून तब्बल ६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. या आठवड्यातील गुणंतवणुकीच्या तिसऱ्या दिवशी ३० शेअर्समधील बीएसई सेंसेक्स ७९०.३४ अंकांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरत ७२, ३०४.८८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २४७.२० १.११ टक्क्यांची घसरण होऊन २१, ९५१.१५ अंकांवर स्थिर झाला. ट्रेडिंगच्यावेळी ९०० अंकांपेक्षा अधिक घसरण पहायला मिळाली.

शेअऱ मार्केटमध्ये आलेल्या या भूकंपानंतर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे मार्केच कॅप ३८६ लाख कोटींपर्यंत घसरले. त्यानंतर गुंतवणुकदारांचे ६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारातील या घसरणीमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, त्यामध्ये सेबीने अलीकडेच केलेले कठोर निर्णय मुख्य कारण असल्याचं मानलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुंतवणुकदारांच्या सुरक्षेसाठी सेबीने कडक नियम बनवले आहेत. स्मॉल कॅप आणि मिडकैप फंड्स मध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे सेबीने म्युचुअल फंड आऊसमधून सर्व गुंतवणुकदारांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी धोरण आखण्याच्या सूचना केल्या आहेत.

Share Market
Salary Hike: नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा पगारात भरघोस वाढ होण्याची शक्यता

इंधनाचे नवे दर जाहीर

आंतरराष्ट्रीय बाजारात रोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट होत असतात. काल कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली होती. अशातच आज मिळालेल्या माहितीनुसार तेलाच्या किमती राष्ट्रीय स्तरावर स्थिर आहेत.

आज देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. काल WTI क्रूड प्रति बॅरल $ 77.66 वर विकले जात होते तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 82.53 वर व्यापार करत होते. जाणून घेऊया महाराष्ट्रासह राज्यातील आजचे दर

. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये (Price) आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये. आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

Share Market
Today's Gold Silver Rate: खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी ! सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरुच, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com