PM Modi Maharashtra : आधी १ रुपयामधील १५ पैसेच लोकांना मिळायचे; काँग्रेसच्या कारभारावर पंतप्रधान मोदींची टीका

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
PM Modi
PM Modi
Published On

PM Modi Maharashtra visit Narendra Modi In Yavatmal :

देशाचा विकास करण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा समर्पित करणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ येथे केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी परत एका काँग्रेस सरकारच्या कारभारावर शरसंधान केलं.(Latest News)

जय भवानीचा जय घोष करत पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मराठीतून आपल्या भाषणाला आपली सुरुवात केली. त्यानंतर बंजारा भाषेतून बोलत मोदींनी यवतमाळमधील जनतेचं मने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर होते. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते. त्यावेळी काँग्रेसच्या काळात देशाची काय अवस्था होती. शेतकऱ्यांना शेतकरी योजनांचा लाभ मिळत नव्हता. २०१४ आधी देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातले होते, तेव्हा पॅकेज जाहीर व्हायचं पण शेतकऱ्यांना मिळायचं नाही. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचलीय. हीच तर मोदींची गॅरंटी असल्याचं मोदी म्हणाले. याच ठिकाणी काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी खाऊन टाकले असते, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.

यवतमाळमध्ये ४०० पारचा नारा

आपण १० वर्षांपूर्वी चाय पर चर्चा कार्यक्रम करण्यासाठी यवतमाळमध्ये आलो होतो. त्यावेळी येथील जनतेने खूप प्रेम दिलं. त्यावेळी यवतमाळमधील लोकांनी एनडीएला ३०० पार नेले. त्यानंतर २०१९ मध्ये आलो तेव्हाही यवतमाळकरांनी खूप प्रेम दिले आणि एनडीएला ३५० पार पोहोचवले. आणि आता २०२४ मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलोय. तेव्हा देशात एकच आवाज आहे, तो म्हणजे अब की बार ४०० पार. आज मोठ्या संख्यने महिला भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi
Politics News: विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com