Maharashtra Politics : मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र

Vanchit Bahujan Aghadi Latest update : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावात आहे.
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSaam tv
Published On

सुनील काळे, मुंबई

vanchit bahujan aghadi Latest News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाच्या जागावाटपांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावात आहे. (Latest Marathi News)

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्या दिवशी शरद पवार, उद्धव ठाकरे असतील, तेव्हा प्रकाश आंबेडकर असतील. आज आम्ही बैठकीत प्रस्ताव दिला आहे. आम्ही ४ मागण्या मांडल्या. जालन्यातून मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी. तर पुण्यातून अभिजीत वैद्य यांना अधिकृत उमेदवार घोषित करावे'.

Vanchit Bahujan Aghadi
CM Fake Signature: धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

'१५ ओबीसींच्या, ३ अल्पसंख्याक उमेदवारी द्याव्यात. एकूण २७ जागांचा प्रस्ताव सादर केला. आम्ही २७ जागांसाठी यादी दिली, काही अपवाद वगळता चर्चा करू. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहे. जालन्यामधून मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला काय प्रस्ताव दिला?

१) महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवार म्हणून जाहीर करावे

२) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.

३) महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.

४) लोकसभेच्या निवडणुकीत किमान ०३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com