Cm Eknath Shinde Fake Signature on Statements
Cm Eknath Shinde Fake Signature on StatementsSaam Tv

CM Fake Signature: धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Cm Eknath Shinde Fake Signature on Statements: एक मोठी बातमी समोर आली आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही केल्याचा प्रकार घडला आहे.
Published on

Cm Eknath Shinde Fake Signature on Statements:

एक मोठी बातमी समोर आली आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cm Eknath Shinde Fake Signature on Statements
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल

मिळाल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. (Latest Marathi News)

नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.

Cm Eknath Shinde Fake Signature on Statements
Himachal Pradesh Political Crises : 'लढत राहू...', राजीनाम्याच्या अफवेनंतर मुख्यमंत्री सुक्खू यांची पहिली प्रतिक्रिया

यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com