1400 कोटींचं कंत्राट थांबवल्यानं जरांगेंचं आंदोलन, विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर मोठा आरोप

1,400 Crore Contract Controversy: जरांगे यांच्या निकटवर्तींयांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटाला स्थगिती दिल्यामुळेच आंदोलन केल्याचा मोठा आरोप करण्यात आलाय. कोणत्या खात्याची ही कंत्राटं आहेत ? कोणत्या मंत्र्याशी सेटलमेंट केल्याचा आरोप आहे? पाहूयात हा रिपोर्ट...
MANOJ JARANGE PROTEST
MANOJ JARANGE PROTESTsaam tv
Published On

मराठा आरक्षणासाठी जरांगेनी गेल्या तीन वर्षांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषण करत सरकारला गुडघ्यांवर आणलं. यावेळीही जरांगेंनी पुन्हा मुंबईत धडक देण्यासाठी उपोषण सुरू असतानाच मुंबईची वाट धरली. मात्र पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत माघार घेतली. मात्र यामुळे पहिल्यांदाच जरांगेंचं आंदोलन वादात सापडलंय. जरांगेंच्या आंदोलनाच्या हेतूवरच शंका उपस्थित केली जातेय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.

जरांगेंच्या निकटवर्तीयांच्या सिंचन खात्यातल्या १४०० कोटींच्या कंत्राटाला स्थगिती दिल्यामुळेच जरांगेंनी आंदोलनाचा जळफळाट केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तर जरांगेंचे माजी सहकारी अजय बारस्करांनी तर थेट या सेटलमेंटमध्ये अंतरवालीच्या सरपंचांचा मुलगा आणि एक कंत्राटदारांनी विखेंशी बंददाराआड चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचा आरोप केलाय.

जरांगेंनी उपोषणाच्या सुरूवातीला अनेक मंत्र्यांवर टीका केली. मात्र विखेंवर अत्यंत विखारी शब्दात टीका केली होती. उपोषण सो़डल्यानंतर मात्र याच जरांगेंचं विखेंवर अचानक प्रेम उफाळून आल्यामुळे मोठी चर्चा रंगू लागलीय.

यापूर्वीही जरांगेंच्या धरसोड वृत्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र यावेळी थेट त्यांच्यावर कंत्राटदारांच्या सेटलमेंटसाठी आंदोलनाचा वापर करण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आता या आरोपांना जरांगे काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com