मनोज जरांगेंचे ७ किलो वजन घटले, मध्यरात्री प्रकृती बिघडली! धुळे-सोलापूर हायवेवर जाळपोळ, आज सरकार निर्णय घेणार?

Manoj Jarange Health Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. ७ किलो वजन घटल्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली आणि सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange Patil loses 7 kg during Maratha reservation hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. सलग ११ दिवस अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या वजनात तब्बल ७ किलोने घट झाली असून, काल मध्यरात्री त्यांची प्रकृती चिंताजनक रीतीने खालावली. या घटनेमुळे राज्यभरात मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे.

मध्यरात्री हायव्होल्टेज घडामोडी आणि सलाईन सुरू

चार दिवसांपूर्वी सरकारने शब्द न पाळल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी पाणी, वैद्यकीय तपासणी आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, काल मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत आणि इतर काही मंत्र्यांनी जरांगे यांच्याशी फोनवरून थेट संवाद साधला. सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जरांगे यांनी उपचारांना होकार दिला. काल मध्यरात्रीपासून त्यांच्यावर सलाईनद्वारे वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Manoj Jarange Patil
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA ची सर्वात मोठी कारवाई; राज्यातील ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २१ जणांना बेड्या

मराठा समाज आक्रमक; धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ

दुसरीकडे जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच मराठा आंदोलकांचा संताप अनावर झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील शहागड फाटा येथे मध्यरात्री आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. "सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा अंतरवली सराटीत दाखल झालेल्या मराठा बांधवांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

आज सरकारचे शिष्टमंडळ भेटणार; निर्णयाकडे लक्ष

जरांगेंच्या खालावलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचे अधिकृत शिष्टमंडळ अंतरवली सराटीत पोहोचून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर काय ठोस भूमिका मांडली जाते आणि जरांगे पाटील त्यावर काय निर्णय घेतात, यावर आगामी आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com