Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला सूचना; म्हणाले, या उमेदवारांना द्या पाठींबा

Lok Sabha Election 2024 : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आत द्यावं, आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृतवाखाली मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते.
manoj jarange patil
manoj jarange patilsaam tv
Published On

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil :

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करा. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे व्हा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.

manoj jarange patil
IPL 2024: IPL च्या पहिल्याच सामन्यात वाद! विराटकडून रचिनला शिवीगाळ? Video तुफान व्हायरल

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10 टक्के आरक्षण 50 टक्क्यांच्या आत द्यावं तरच सरकारने दिलेलं आरक्षण स्वीकारू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृतवाखाली मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने गावा-गावातून अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. त्यामुळे आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन सर्व जाती धर्माचा जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा आणि त्याला अपक्ष निवडणूक लढवायला लावा किंवा सगेसोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉण्ड करून पाठिंबा देईल त्याला पाठिंबा द्या, मग तो कोणत्याही पक्षाचा असो असे दोन पर्याय देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत.

राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बणा असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. 30 तारखेपर्यंत कोण उमेदवार असणार हे निश्चित करा असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.

manoj jarange patil
Viral Video: रिक्षाचालकाचा देशी जुगाड! पाईप वापरुन थेट रिक्षात बनवला AC; पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com