मराठा आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करणे टाळणाऱ्या जरांगे पाटलांनी आता थेट शिंदेंवरच निशाणा साधलाय...मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींच्या कुणबी नोंदी अवैध ठरवल्यानंतर जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय...एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा डबल गेम केल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंना बरं म्हणायची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावलाय. आणखी काय मोठे आरोप केले ते पाहूयात...
विशेष म्हणजे शिंदे आणि त्यांचे संभाजीनगरातले मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदिपान भुमरे ओबीसी नेत्यांना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेनी केला. शिंदेंवर संतापलेल्या जरांगेंची समजूत काढण्यासाठी थेट उद्योगमंत्री उदय सामंतनी जरांगेंनी पत्रकार परिषद सुरू असतानाच फोन केला. यावेळी त्यांनी अवैध ठरवलेल्या कुणबी दाखल्यांबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. नेमका काय संवाद झाला ते पाहूयात...
मुळात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आतापर्यंत तब्बल 8 उपोषणे आणि अनेक भव्य मोर्चे काढले. त्या प्रत्येक आंदोलनात जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केलीय... शिंदेंवर उघडपणे टीका करण्याची जरांगेंची ही पहिलीच वेळ आहे...त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता शिंदे या अवैध नोंदींवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊन जरांगेंची मागणी पूर्ण करणार की हा संघर्ष वाढत जाणार याची उत्सुकता आहे,.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.