Manoj Jarange Patil Sabha: आरक्षणासह सरकारी नोकरी ...; जरांगे पाटलांनी सरकारसमोर मांडल्या प्रमुख मागण्या

Manoj Jarange Patil Speech: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी काही प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत.
Manoj Jarange Patil Sabha
Manoj Jarange Patil SabhaSaam TV
Published On: 

Manoj Jarange Patil Jalna Sabha:

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आज अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहिला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी काही प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil Sabha
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना तातडीने अटक करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांचं गृहसचिवांना पत्र

१. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा.

२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी.

३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी.

४. ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचे दर दहा वर्षांत एकदा सर्व्हे करण्यात यावेत. तो सर्व्हे करुन प्रगत असलेल्या जाती बाहेर काढण्यात याव्यात.

५. पुढील १० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

६. सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देण्यात यावा.

७. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या. महाराष्ट्रातील मराठा समाजाचा वेगळा प्रवर्ग करा आणि आरक्षण द्या.

आरक्षणासाठी ४० दिवसांची दिलेली मुदत आता संपत आली आहे. राज्य सरकारकडे फक्त १० दिवस शिल्लक आहेत. या १० दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा उपोषण करून माझी अंतयात्रा निघेल नाही तर आरक्षणासह विजययात्रा निघेल, असं जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलं.

मराठा बांधवांना संबोधित करताना छगन भुजबळ तसेच वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्यावरही जरांगे पाटलांनी सडकून टीका केली.

Manoj Jarange Patil Sabha
Manoj Jarange Patil Sabha News | जरांगेंच्या सभेचं 100 एकरावर भव्य आयोजन!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com