Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना तातडीने अटक करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांचं गृहसचिवांना पत्र

Gunaratna Sadavarte on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल. पोलिसांनी या सभेला परवानगी देऊ नये, असं सदावर्ते यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Arrest to Manoj Jarange Patil lawyer Gunaratna Sadavarte letter to Home Secretary
Arrest to Manoj Jarange Patil lawyer Gunaratna Sadavarte letter to Home SecretarySaam TV
Published On

Gunaratna Sadavarte on Manoj Jarange

मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करा, अशी मागणी वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केली आहे. गृहसचिव आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांना पत्र लिहत सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातील अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल. पोलिसांनी या सभेला परवानगी देऊ नये, असं सदावर्ते यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Arrest to Manoj Jarange Patil lawyer Gunaratna Sadavarte letter to Home Secretary
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट; क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार

मराठा आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरणारे मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेने कूच केली आहे. सभा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला आहे.

अशातच जरांगे पाटील यांना तातडीने अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, जालन्यात होणारी मराठा समाजाची सभा हिंसक होईल, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी सदावर्ते यांना उत्तर दिलं. गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले. तसेच सभा हिंसक होणार नाही, असं स्पष्टीकरण देखील जरांगे यांनी दिलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची ही सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. राखीव दलाबरोबरच हजारभर पुरुष तसेच महिला पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक असा फौजफाटाही तैनात असणार आहे. संपूर्ण बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस अधीक्षकांकडे असणार आहे.

Arrest to Manoj Jarange Patil lawyer Gunaratna Sadavarte letter to Home Secretary
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर शिक्कामोर्तब, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाची लागणार वर्णी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com