राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय....एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी 'महा एल्गार मोर्चा' काढला... मात्र हा संघर्ष आता थेट जरांगेंच्या लाल गोधडीपर्यंत जाऊन पोहचलाय. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि आंदोलनस्थळी वापरल्या जाणाऱ्या 'लाल गोधडी' वर शंका उपस्थित केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलयं... हाके काय म्हणाले ऐका...
दरम्यान हाकेंनी फक्त जरांगेंच्या उपोषणावर संशयचं व्यक्त केला नाही... तर सरकारनं जरांगेंच्या मेडिकल टेस्ट्सची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही हाकेंनी केलीय...त्यामुळे जरांगेंच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजात आणखी ऱोष पसरलाय..जरांगेंवर वारंवार टीका करत राहिलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच मराठा आंदोलकांनी दिलाय...
जरांगेंनी आतापर्यंत १० पेक्षा जास्त वेळा आमरण उपोषण केलंय. मात्र उपोषण करताना ते वापरत असलेली गोधडी एकाच रंगाची दिसून येते. त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी आता याच गोधडीचा मुद्दा पुढे केलाय. आता जरांगे या गोधडीवर काय स्पष्टीकऱण देतात याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.