जरांगेंची आंदोलकांसह मुंबईकडे कूच, मरणार पण शरण नाही जाणार

Manoj Jarange Patil Mumbai March: अखेर जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेत...त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहचला असून संघर्ष अटळ आहे....अशातच जरांगेंनी सरकारला काय इशारा दिलाय...
MANOJ JARANGE PATIL MARCHES TOWARDS MUMBAI
MANOJ JARANGE PATIL MARCHES TOWARDS MUMBAIsaam tv
Published On

मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी अखेर मनोज जरांगे पाटील ठरल्याप्रमाणे समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं कूच केलीय. पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर एकटाच मुंबईला येणार असं सांगणाऱ्या जरांगे एका गाडीतून निघाले खरे मात्र त्यांच्यासोबत हजारो मराठा समर्थकही मुंबईच्या दिशेनं चालू लागले आहेत. यावेळी साम टिव्हीशी बोलताना जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत... मेलो तरी शरण जाणार नाही, असं म्हणत सरकारवर जरांगेंनी कसं टीकास्त्र डागलयं... ऐका...

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंच्या इशाऱ्यानंतर काय भूमिका मांडलीय..ऐका...

आंदोलनासाठी जरांगेंचं पोलिसांना हमीपत्र

19 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने 18 सप्टेंबरला परवानगी मिळावी

5 ते 50 लोकच आंदोलनात सहभागी होणार, आंदोलनात 10 स्वयंसेवक असतील

वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही

सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही

सार्वजनिक शांतता अबाधित राखली जाईल, अशी ग्वाही जरांगेंनी दिलीय.

जरांगेंनी जरी एकटेच मुंबई येणार असल्याचं सांगितलं असलं तरी मराठे गनिमीकाव्याचा वापर करत वेगवेगळ्या मार्गानं मुंबईत दाखल होण्याची चिन्ह आहेत... जरांगेंचे मुबईत आंदोलनाचे दोन अर्ज पोलिसांनी फेटाळले आहेत. आता तिसऱ्या अर्जावर पोलीस काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा असली तरी जरांगे आता मुंबईच्या दिशेनं निघाल्यामुळे पुढचा संघर्ष अटळ असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com