मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी परत एकदा 29 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचे सांगितल्याने महायुती सरकारला मोठे टेन्शन आले आहे. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमानपत्रांना जात वैधता दिली जात नाहीये, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी घणघाती हल्लाबोल चढवला आहे. बावनकुळे हे मराठा समाजाची प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याशिवाय ते व्यवस्थित होणार नाहीत अशी सडकून टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी मराठा समजाला आवाहन केले आहे. मराठ्यांनी एकजूट व्हावे, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा सुरू केलाय. आज त्यांनी पंढपरपुर येथे जाहीर सभा घेतली. मी मराठा समाजाला कधीच चुकीचे सांगितले नाही. मी एकवेळ स्वतः फाशी घेऊन मरेन. पण समाजाला खोटं सांगून फसवणार नाही. समाजाचा माझावर मोठा विश्वास आहे. तो मी कधीच गमावणार नाही असे भावनिक आश्वासन ही जरांगे पाटील यांनी दिले. आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथी सभा झाली.
सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजाची मी कधीच फसवणूक करणार नाही असे स्पष्ट केले. विरोधकांकडून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याची टीका केली जात आहे. यावर त्यांनी समाजासाठी फाशी घेईन पण खोटं बोलणार नाही. माझ्यात जातीवंत मराठ्याचे रक्त आहे. मी कधीही समाजासोबत गद्दारी करणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.