Manoj Jarange: "आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, फक्त तुम्ही..." मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन

Manoj Jarange Patil Beed sabha: मराठा समाजाचे आंदोलन रोखण्याची धमक कोणामध्येही राहिलेली नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तसूभरही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
manoj jarange patil appeals maratha community in Beed sabha
manoj jarange patil appeals maratha community in Beed sabha Saam TV
Published On

Manoj Jarange on Maratha Community

मराठा समाजाचे आंदोलन रोखण्याची धमक कोणामध्येही राहिलेली नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तसूभरही मागे हटणार नाही. फक्त माझी मराठा बांधवांना विनंती आहे, की तुम्ही आत्महत्या करू नका. असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे. ते बीडच्या सभेत बोलत होते.  (Latest Marathi News)

manoj jarange patil appeals maratha community in Beed sabha
MP Election 2023: मध्य प्रदेशात तिकीट वाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, तुफान हाणामारीचा VIDEO आला समोर...

मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये (Beed News) जाहीर सभा पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सभेत बोलताना जरांगे म्हणाले, उशिरा का होईना मराठा जागा झाला याचा आनंद आहे. पण आजही आपल्या परिवारातील एक तारा गेला. जर पोरंच मरायला लागले तर आरक्षण द्यायचं कुणाला?

माझी राज्य सरकारला विनंती आहे, की त्यांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करुन येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण द्यावं, अन्यथा मराठ्यांसोबत खेटणं तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी घेऊन बीडमध्ये 45 वर्षीय दत्तात्रय काळकुटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे यांनी रात्री अडीच वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन आत्महत्याग्रस्त काळकुटे परिवाराची भेट घेतली.

यानंतर माध्यमांसोबत बोलताना जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला. आम्ही दत्तात्रय काळकुटे यांची बलिदान वाया घालू देणार नाही. त्या कुटुंबाला 50 लाख रुपये देऊन त्याचा पुनर्वसन करावे, अन्यथा आम्ही सरकारला जगू देणार नाहीत. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Edited by - Satish Daud

manoj jarange patil appeals maratha community in Beed sabha
Rashi bhavishya: बोलण्यावर संयम ठेवा, हितशत्रूंपासून सावध राहा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com