ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत तणाव? भाजपचा जरांगेंआडून शिंदेंना संपवण्याचं कट? फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कुणाची ताकद?

Manoj Jarange Patil 500 Crore Audio Clip Controversy: ऑडिओ क्लिपवरून जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर भाजप- शिंदेसेनेत चांगलाच तणाव निर्माण झालाय...शिंदेसेनेच्या नेत्यांंनं भाजपवर तर भाजप नेत्यानं शिंदेसेनेवर कशी चिखलफेकी केलीय...पाहूयात...
BJP and Shinde Sena internal conflict over Jarange audio
BJP and Shinde Sena internal conflict over Jarange audiosaam tv
Published On: 

भाजप आणि शिंदेसेनेत अंतर्गत धुसफूस काही नवी नाही. मात्र जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बनंतर पहिल्यांदाच सुप्त संघर्ष थेट चव्हाट्यावर आलाय...शिंदेसेना आणि भाजपचे नेते ऑ़डिओ बॉम्बवरून उघडपणे पत्रकार परिषद घेऊन जरांगेंना मोठं कुणी केलं? यावरून एकमेंकावर जाहीररित्या आरोप-प्रत्यारोप करतायत...शिंदेसेनेच्या रामदास कदमांनी भाजप जरांगेंच्या आडून शिंदेंना संपवण्याचं कट रचत असल्याचा आरोप केलाय...तर फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना ताकद कुणी दिली? असा सवाल उपस्थित करत भाजप आमदार प्रवीण दरेकारांनी शिंदेसेनेवर निशाणा साधलाय...

दरम्यान या वादात विरोधी पक्षांनीही उडी घेतलीय.. ऑडिओ बॉम्बनंतर भाजप-शिंदेसेनेतील तणाव वाढलेला असताना राज ठाकरेंनी X पोस्टद्वारे महायुतीतील अंतर्गत वादावर निशाणा साधलाय...ऑडिओ बॉम्बच्या प्रकरणाला ठाकरेंनी थेट फ्रेंडशिप फाईल म्हटलयं...

सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. जी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेलच. भाजपचे काही पदाधिकारी आणि चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ही ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधत, "हे दोन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी हे सगळे उद्योग करत आहेत," असा घणाघाती आरोप केलाय...

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून आता फक्त विरोधक आणि सरकार असा सामना राहिलेला नाही, तर तो महायुतीमधील मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्षात बदलला आहे. आता येत्या काळात महायुतीतील हा वाद टोकाला जाणार की दोन्ही पक्षातील प्रमुख नेते या वादावर पडदा टाकून जरांगेंही थंडावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com