Manohar Mama Bhosale : भोंदू मनोहरच्या वाढदिवसाला होती चक्क ९० आमदारांची उपस्थिती; अलिशान हॉटेलमध्ये भरायचा दरबार, धक्कादायक माहिती उघड

Manohar Mama Bhosale Case Update : मनोहर मामा भोसले प्रकरणात धक्कादायक खुलासे. २७ एकरांवर आलिशान मठ असलेल्या भोंदू मनोहर भोसलेच्या वाढदिवसाला राजकीय नेत्यांच्या उपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला.
MANOHAR BHOSALE FAKE GODMAN CASE 27 ACRE ASHRAM POLITICAL LINKS
MANOHAR BHOSALE FAKE GODMAN CASE 27 ACRE ASHRAM POLITICAL LINKSSaam Tv
Published On
Summary
  • ‘मनोहरमामा’ प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

  • २७ एकरांवर आलिशान मठ उभारला

  • राजकीय नेत्यांच्या उपस्थितीचे दावे

  • अंधश्रद्धा आणि फसवणुकीवर पुन्हा चर्चा

स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ ‘मनोहरमामा’ प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. साध्या झोपडीपासून सुरुवात केलेल्या भोसलेने आज तब्बल २७ एकरांवर आलिशान मठ उभारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या मठात राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि राजकीय कार्यकर्ते ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

घोटी येथील सरपंच विलास राऊत यांनी म्हटल्यानुसार, मनोहर भोसलेचा वाढदिवस हडपसरजवळील एका रिसॉर्टमध्ये साजरा करण्यात आला होता. ज्यामध्ये राज्यातील तब्बल ९० आमदार उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर पुढील वाढदिवसाला १४५ ते १५० आमदार उपस्थित राहतील, असा दावा भोसले याने केला असल्याचं राऊत यांनी सांगितले.

MANOHAR BHOSALE FAKE GODMAN CASE 27 ACRE ASHRAM POLITICAL LINKS
Shocking : मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्याचं दिलं वचन; नराधम महिलेच्या घरात शिरले, संधी साधून केलं हादरवणारं कृत्य

उंदरगाव (ता. करमाळा) येथील साध्या घरातून भविष्य सांगण्यास सुरुवात करणाऱ्या भोसलेने हळूहळू आपले जाळे विस्तारले. सुरुवातीला स्थानिक गावांतील लोक त्याच्याकडे येत असत, मात्र त्याच्या ढोंगीपणाचा अनुभव आल्यानंतर काहींनी येणे बंद केले. तरीही पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांतील श्रीमंत, उद्योगपती, राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होत राहिल्या.

MANOHAR BHOSALE FAKE GODMAN CASE 27 ACRE ASHRAM POLITICAL LINKS
Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

मिळालेल्या माहितीनुसार, भोसलेने घोटी परिसरात २७ एकरांत मठ उभारला असून कर्नाटकमधील गाणगापूर येथेही त्याने मठाची उभारणी केली आहे. नवी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये तो भक्तांचा दरबार भरवत असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मठाच्या शेजारील रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. या प्रकरणामुळे भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि त्यामागील मोठे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com