Nagpur : चिमुकली घरबाहेर खेळत होती, भरधाव कारने चिरडलं; रस्ता रक्ताने माखला

9-Year-Old Girl Dead in Car Accident: नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. घरासमोर खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीला भरधाव कारने चिरडले.
Nagpur Car Accident
Nagpur Car AccidentSaam
Published On

नागपूर शहरातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला एका भरधाव कारने चिरडले आहे. अपघातानंतर कार थेट विजेच्या खांबावर आदळली. तसेच घरात घुसली. या भीषण अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने पकडले तसेच बेदम चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. माहेरा कौसर अशफाक सय्यद असे ९ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. ही चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक एक भरधाव वेगाने कार आली. तिने चिमुकलीला उडवले. नंतर कार विजेच्या खांबाला धडकली. या भीषण अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Nagpur Car Accident
Beed Crime : बायको भांडून पुण्याला गेली, नराधम बापाकडून ११ वर्षीय पोटच्या चिमुकलीवर अत्याचार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच मुलीला घेऊन तातडीने रूग्णालयात धाव घेतली. तसेच कार चालकाला पकडून त्याला बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेत चौकशीला सुरूवात केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले असून, अपघात कसा झाला, चालक कोणत्या अवस्थेत होता, याचा तपास सुरू आहे.

Nagpur Car Accident
Petrol Diesel: पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पाहा आजचे दर

चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांमध्येही संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com