पाणीप्रश्नी निवेदन द्यायला गेला; थेट आयुक्तांच्या अंगावर धावला

Aurangabad News : औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
Man has tried to attack on aurangabad commissioner astik kumar pandey over water issue
Man has tried to attack on aurangabad commissioner astik kumar pandey over water issueSaam Tv
Published On

औरंगाबाद : पाणीप्रश्नावरून (Water Issue) निवेदन देण्यासाठी गेलेल्या २ जणांनी औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar pandey) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी दीड दरम्यान हा प्रकार घडला. अरेरावी भाषा करत आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्यानं महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेदरम्यान आयुक्तांचे सुरक्षारक्षक मध्ये आल्यानं आयुक्त पांडेय यांच्यावरील हल्ला टळल्याचं औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. मात्र, निवेदन देताना आयुक्तांच्या अंगावर धावून जाणं दोन व्यक्तींना महागात पडलं आहे. औरंगाबाद महापालिकेने या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. (Man has tried to attack on aurangabad commissioner astik kumar pandey over water issue)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय कार्यालयीन काम आटपून दुपारच्या जेवणासाठी निघाले होते. त्यावेळी राहुल इंगळे नामक व्यक्तीनं त्यांना पाणीप्रश्नावरून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्त पांडेय यांनी सदर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. मात्र, आक्रमक इंगळे यांना आयुक्तांच्या उत्तरावर समाधान न मिळाल्यानं आयुक्तांना अरेरावी भाषा करू लागला. तसेच इंगळेचा सहकारी योगेश मगरे घटनेचं चित्रीकरण करू लागला. इंगळे पाणीप्रश्नासाठी थेट आयुक्तांच्या अंगावर गेले, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत आयुक्तांना वाचविले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले. मात्र, त्यावेळी दोघांनी त्यांनाही अरेरावीचे उत्तर दिली.

Man has tried to attack on aurangabad commissioner astik kumar pandey over water issue
धक्कादायक! नर्सला हवं होतं बाळ, एजंटसोबत केली डील; त्यानंतर...

दरम्यान, राहुल इंगळे आणि योगेश मगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने सिटी चौक पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जात त्यांनी आयुक्तांवर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा करणे, विनापरवाना शासकीय कार्यालयात छायाचित्रीकरण करणे, शासकीय कार्यालयाची शांतता भंग करणे इत्यादी बाबींसाठी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. आयुक्तांच्या अंगावर जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

दरम्यान, सदर प्रकरणावर शहर मुख्य अभियंता सखाराम पानझडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पानझडे म्हणाले, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर एक तरुण अंगावर धावून गेल्यानंतर महापालिकेत मोठा गोंधळ झाला. त्या हल्लेखोरावर कारवाई करावी, यासाठी महापाकिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन घेणार नाही, अशी भूमिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पुढे पानझडे म्हणाले, 'पाणी प्रश्नावरून राहुल इंगळे हा तरुण आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आला होता. त्यावेळेस आयुक्तांनी हा प्रश्न सोडवला जात असल्याचे त्याला सांगितलं. तरीही त्या तरुणाने आयुक्तांशी अरेरावी सुरू केल्याने गोंधळ झाला. त्यावेळी सुरक्षा रक्षक समोर आल्यानं आयुक्त बचावले असल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे', असंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com