धक्कादायक! नर्सला हवं होतं बाळ, एजंटसोबत केली डील; त्यानंतर...

Nagpur Crime News : धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोनही महिला एका रुग्णालयातील परिचारिका आहेत.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam Tv

नागपूर : नागपुरातील एका महिलेने तीन वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांच्या मार्फत तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र, त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाअंती 3 महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोनही महिला एका रुग्णालयातील परिचारिका आहेत. (Nagpur Latest Marathi News)

Nagpur Crime News
रुग्णालयातील ११ नर्स एकाच वेळी गरोदर; ३ वर्षांपूर्वीही इथं असंच घडलं होतं

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहभागी असलेल्या महिलेच्या घरी दोन मुलं आणि पती असे चार सदस्य होते. यापैकी मोठा मुलगा आणि पती दारुडा आहे तर दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याने ती महिला एकटी पडली होती. दारुड्या मुलाकडे म्हातारपणी आपला निभाव लागणार नाही या चिंतेत असलेल्या महिलेने एक बाळ दत्तक घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश न आल्याने त्यांनी (आयव्हीएफ) टेस्ट ट्यूब बेबीसाठी सुद्धा प्रयत्न केले मात्र त्यातही यश मिळाले नाही. त्यादरम्यान रुग्णालयातील दोन परिचारिका त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांनी बाळ हवं असेल तर सलामुल्ला खान या एजंट सोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

महिलेने एजंट सलामुल्ला खान सोबत संपर्क केला असता त्याने तीन लाख रुपयांमध्ये बाळ उपलब्ध करून दिले. सुमारे 3 वर्षे ही बाब लपून राहिली. मात्र, ज्यावेळी त्या महिलेच्या मोठ्या मुलाला या प्रकरणाची कुणकुण लागली, तेव्हा पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला. तेव्हा महिलेने बाळ तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याचं स्पष्ठ झालं. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणात महिलेसह दोन परिचारिका आणि दलाल सलामुल्ला खान याला अटक केली आहे.

बाळ असावं असं प्रत्येक महिलेला वाटत. मात्र, ते स्वतःच नसेल किंवा दत्तक घ्यायचं असेल तर एक प्रक्रिया असते आणि ते पूर्ण करावी लागते. मात्र, या महिलेने सगळे नियम बाजूला ठेवत चुकीचा मार्ग अवलंबला आणि आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com