Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा मैदानात, माळेगावमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा मैदानात, माळेगावमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?
Sharad Pawar Vs Ajit PawarSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अपक्ष उमेदवारांसह ९० उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री. नीलकंठेश्वर पॅनेलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे गुरू-शिष्य एकत्र मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं बळीराजा पॅनेल आहे. कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून अजित पवारांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल मैदानात आहेत.

Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा मैदानात, माळेगावमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, शहाजी बापू पाटील यांचं विठूरायाला साकडं, पाहा व्हिडिओ

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये २१ संचालक पदांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. १९६५१ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बारामती शहरातील प्रशासकीय भवनातील अभियांत्रिकी कक्षामध्ये अजित पवार यांनी मतदान केले. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३७ गावे येत असून ६७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा मैदानात, माळेगावमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?
Political News: १६ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला नेता सोडणार पक्षाची साथ? रंगली भाजप प्रवेशाची चर्चा

मतदान करण्यासाठी आलेल्या अजित पवार यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. माळेगाव सरकारी साखर कारखाना निवडणूक मतदानावर त्यांनी सांगितले की, 'लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. ते मतदार पार पडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील.' तर चेअरमन पदाचा उमेदवार यावर बोलताना ते म्हणाले की, 'मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे तुला काय त्रास आहे. मी ३५ वर्षे इथे काम करतोय. मीडियाने दाखवलं नसते तर चर्चा झाली नसती.'

Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा मैदानात, माळेगावमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?
Maharashtra Politics: मनसे न आल्यास ठाकरे सेनेचं एकला चलो? ठाकरेंचा प्लॅन बी; डिनर डिप्लोमसीत काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com