
विधानसभेनंतर पुन्हा एकदा काका-पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढण्याचे संकेत युगेंद्र पवारांनी दिलेत. मात्र माळेगाव साखर कारखाना काका-पुतण्यासाठी इतका महत्वाचा का आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व आहे. मात्र शरद पवारांनी आदेश दिला तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत युगेंद्र पवारांनी दिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत कारखान्याच्या वर्चस्वातून काका-पुतण्या संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. हा माळेगाव साखर कारखाना दोन्ही पवारांसाठी महत्वाचा का आहे? पाहूयात.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य साखर कारखाना अशी ओळख
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 19 हजार 549 सभासद
ज्याचं कारखान्यावर वर्चस्व त्याचं तालुक्यावर वर्चस्व अशी धारणा
यापुर्वी अजित पवारांनी भाजपचे नेते आणि सहकारातील तज्ज्ञ चंद्रराव तावरें आणि रंजन तावरेंच्या हातातून कारखाना ताब्यात घेतला....मात्र आता तावरे आणि अजित पवार हे महायुतीत असल्याने त्यांच्याविरोधात पवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. कारण अजित पवारांनी युगेंद्र पवारांविरोधात पॅनल उभा केल्यास लढत रंगतदार होणार हे निश्चित. आता अजित पवार पुतण्या युगेंद्रच्या नेतृत्वातील पॅनलसमोर उमेदवार उतरवणार की बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गड लढवणार? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.