Political News: १६ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला नेता सोडणार पक्षाची साथ? रंगली भाजप प्रवेशाची चर्चा

Shashi Tharoor: पहलगाम हल्ल्यानंतर जगभरात भारताचे शिष्टमंडळं गेली होती. त्या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर होते. त्यावेळी थरूर यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली होती.
Shashi Tharoor Likely To Join BJP
Rahul Gandhisaam Tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्ताचा दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी भारताची शिष्टमंडळे जगभरात रवाना झाली होती. परदेशात पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवादाला पाठिंबा देत आहे, ही गोष्ट उघडकीस आणून देण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळांनी केला. दरम्यान या शिष्टमंडळात भाजपच्या नेत्यांसह देशातील विरोधी पक्षातील नेतेही होते. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूरही होते. त्यामुळे थरूर अडचणीत आलेत.

शशी थरूर यांनी त्यांनी काँग्रेसला न पटणारी विधाने केली होती. आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झालीय. पहलगाम हल्ल्यावर केंद्र सरकारला थरुर यांनी परदेशात जाऊन क्लीन चिट दिली होती. यावरून काँग्रेस नाराज झाली होती. पहलगाम हल्ल्यांबद्दल माहिती मिळाली जे आपण उधळून लावण्यात अयशस्वी झालो. कोणत्याही देशात ही एक सामान्य गोष्ट आहे. कोणत्याही देशाकडे विश्वासार्ह गुप्तचर यंत्रणा नाहीये, असं थरूर म्हणाले.

त्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारला क्लीन चीट दिली, हीच गोष्ट देशातील काँग्रेस नेत्यांना आवडली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणं सुरू केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना थरूर यांनी आपण कोणत्याच टीकेला उत्तर देणार नसल्याचं म्हटलं होतं. सध्या मला यावर बोलण्यास वेळ नाही, आल्यावर पाहू, असं म्हणत त्यांनी प्रत्तुत्तर दिलं होतं.

Shashi Tharoor Likely To Join BJP
ECI vs Rahul Gandhi : मतदान केंद्रांचे व्हिडिओ फुटेज जारी केले जाणार नाहीत; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

आता थरूर आणि इतर शिष्टमंडळ भारतात परत आली आहेत. या शिष्टमंडळांनी पंतप्रधान मोदींची भेटही घेतली आहे. यावेळी देखील थरूर आणि मोदी यांच्यात चांगली मैत्री दिसली होती. या गोष्टी काँग्रेसला खटकल्या. थरूर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी आपले काँग्रेसच्या नेतृत्वासोबत मतभेद असल्याचे म्हटलंय. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चर्चा करू असं त्यांनी म्हटलं होते. यामुळे थरूर काँग्रेस पक्षाची साथ सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Shashi Tharoor Likely To Join BJP
Rahul Gandhi: 'गरिबांच्या पोरांना इंग्रजी भाषा यावी, हे BJP-RSS ला नकोय',राहुल गांधींचा हल्लाबोल

शशी थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक नेते होते. जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. आतापर्यंत गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांना पक्ष सोडावा लागलाय.

तर मनीष तिवारी आणि शशी थरूर सारख्या नेत्यांना पक्षात साईड लाइन करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तान विरोधात जाणाऱ्या या शिष्टमंडळात सहभागी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने वेगळ्याच नेत्यांची नावे दिली होती. पण पंतप्रधान मोदींनी थरूर यांच्यासह चार नेते निवडले. या नेत्यांची नावे काँग्रेसच्या यादीत नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com